आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागांतर्गत येणाऱ्या औरंगाबाद ते चिकलठाणा रेल्वे लाइनच्या ट्रॅक दुरुस्तीचे काम हाती घेतले असून ते महिनाभर चालणार आहे. रुळाखालील स्लीपर बदलणे, खडी टाकणे सुरू असल्याने शहरातील शिवाजीनगरसह फुलेनगर, राजनगर आणि चिकलठाणा या चार मानवी गेटवर वाहतुकीला अडचण निर्माण होणार आहेत. त्यामुळे गेटवर वाहनधारकांची मोठ्या गर्दी होणार आहे. सध्या अद्ययावत मशीनच्या साह्याने ट्रॅक बदलण्याचे काम केले जात आहे. ट्रॅक दुरुस्तीमुळे काही रेल्वे उशिराने तर काहींच्या वेळेत बदल केल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. रेल्वे ट्रॅक दुरुस्तीमुळे सर्वाधिक फटका शिवाजीनगर रेल्वे गेटवर वाहनधारकांना बसत आहे. पर्यायी रस्ता संग्रामनगर उड्डाणपूल व भुयारी मार्गाचा वाहनधारकांनी वापर करणे बंधनकारक आहे. त्यामुळे तीन ते चार किमी वळसा घालून जावे लागत आहे. या चारही गेटवर रेल्वेचा चौकीदार तैनात करण्यात आला आहे. रेल्वे येण्यापूर्वी १०-१५ मिनिटे प्रत्येक गेट बंद असल्याने दिवसभर वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. शिवाजीनगर भुयारी मार्गासाठी औरंगाबाद खंडपीठाने आदेश देऊनही कामात गती नसल्याचे दिसत आहे. शिवाजीनगर उड्डाणपुलासाठी मनपाला राज्य शासनाने जागेचे अधिग्रहण,निधी दिल्याचे जाहीर केले आहे. परंतु, अद्याप निधी प्राप्त न झाल्यामुळे अधिग्रहणाचे काम होत नसल्याने भुयारी मार्गाचा प्रश्न अधांतरीच आहे.
ट्रॅकच्या दुरुस्तीचे काम जूनअखेपर्यंत चालणार चिकलठाणा ते औरंगाबाद दरम्यानच्या ट्रॅकच्या दुरुस्तीचे काम जूनअखेपर्यंत चालणार आहे. तासाला १ किमी लाइन मशीनद्वारे टाकण्यात येते. जमिनीवर प्रथम १३ मीटर लांबीचे रूळ स्लीपरसह टाकण्यात येतात. त्यानंतर मशीनद्वारे संबंधित रूळ उचलून ट्रॅकवर टाकतात. एका तासाला १ किमी रूळ टाकल्यामुळे कमी कालावधीत जास्तीत जास्त काम केले जाते. त्यामुळे मेगाब्लॉकसारखे निर्णय घेऊन प्रवासी गाड्यांची अडचण होत नाही. शिवाजीनगर आणि बीड बायपासकडे एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या आहे. मोठी मंगल कार्यालये आणि हॉटेल्स असल्यामुळे चारचाकी व दुचाकीस्वारांची मोठी गर्दी आहे. सातारा-देवळाई, गांधेली, बाळापूर परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक राहत असल्याने शिवाजीनगर रेल्वे फाटकावर मोठा ताण निर्माण झाला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.