आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपात ३० हजार कर्मचारी आणि शिक्षक तसेच घाटीतील जवळपास ७०० नर्स सहभागी होणार आहेत. त्यामुळे घाटी प्रशासनाने १५० नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना कामावर बोलावले आहे. तसेच ५० नर्स बजाज हॉस्पिटलने द्याव्या अशी मागणी केली आहे, अशी माहिती घाटीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय कल्याणकर यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात दररोज किमान एक हजार लोक कामानिमित्त येतात. त्यांनादेखील या संपाचा फटका बसणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी १० वाजता तर घाटीत ८ वाजता आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान, आंदोलनात मनपाचे ४५०० कर्मचारी सामील होणार आहेत. पण शहरवासीयांची गैरसोय टाळण्यासाठी काम बंद न करता ते काळ्या फिती लावून आंदोलनाला समर्थन देतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.