आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कागदपत्र, साक्षीदार अन् मालकही बनावट:औरंगाबादमध्ये शेतजमीन बळकावण्याचा प्रयत्न; जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला

औरंगाबाद20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बनावट कागदपत्रांसह बनवट साक्षीदार व मालक उभा करून शेतजमीन बळकावण्‍याचा प्रयत्‍न केल्याप्रकरणी अटक आरोपी चंद्रकांत पिराजी वाघमारे (36, रा. तानाजी चौक, शिवशंकर कॉलनी) याने सादर केलेला नियमित जामीन जिल्हा व सत्र न्‍यायाधीश ए. डी. देव यांनी फेटाळला.

नेमके प्रकरण काय?

शिरीष मधुकर देशपांडे (62, रा. दशमेश नगर) यांच्‍या नावे असलेली जमिनीच्या बनावट कागदपत्रांआधारे बनवट व्‍यक्तींना उभे करून आरोपीने जीपीए तयार केला. त्‍या जीपीए आधारे आरोपीने जमीन हडपण्‍याचा प्रयत्‍न केला. या प्रकरणात जयप्रकाश अयोद्याप्रकाश गंगिले (53, रा. जिजामातानगर, मुकुंदवाडी) यांनी वेदांतनगर पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली होती. त्यानंतर सदरील आरोपी विरुद्ध गुन्‍हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली होती. पो‍लिस कोठडीदरम्यान आरोपीने बनावट कागदपत्र बीड बायपास रोडवरील साई मल्टी सर्व्हिसेस दुकानातून तयार केल्याचे सांगितले.

गुन्‍हेगारी पार्श्‍वभूमीचा

आरोपीची पोलिस कोठडीतून न्‍यायालयीन कोठडीत रवानगी केल्यानंतर आरोपीने नियमित जामिनासाठी अर्ज सादर केला होता. अर्जाच्‍या सुनावणीवेळी सहायक लोकाभियोक्ता विनोद कोटेच्‍या यांनी आरोपींनी बनविलेले बनवाट जीपीए हस्‍तगत बाकी आहे, तसेच आरोपी हा गुन्‍हेगारी पार्श्‍वभूमीचा असून त्‍यावर यापूर्वी देखील अशाच प्रकारचे गुन्‍हे दाखल असल्याचे न्‍यायालयाच्‍या निदर्शनास आणून दिले. सुनावणीअंती न्‍यायालयाने आरोपीचा जामीन नामंजुर केला.

बातम्या आणखी आहेत...