आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविद्यापीठात राजभवन कार्यालयाने ५५ ते ६० लाख देऊनही राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवातील खेळाडूंची निवास व्यवस्था केली नाही. त्यांना रात्री ३ वाजेपर्यंत ताटकळत बसावे लागल्याचा प्रकार पहिल्याच दिवशी समोर आला. असे असतानादेखील खेळाडूंना सकाळ आणि संध्याकाळ पौष्टिक जेवण दिले जात नाही. जेवणात कच्चा भात, पोळ्या आणि मर्यादेपेक्षा भाज्यांही तिखट दिल्या जात आहे. एवढेच नव्हे तर जेवणाच्या प्लेटाही स्वच्छ धुतल्या जात नाहीत. त्यामुळे सहभागी २१२० खेळाडू विद्यार्थ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. ग्राउंडजवळ स्वच्छतागृह हवे हाेते. परंतु, विद्यापीठाने तशी सुविधा केली नसल्याने ड्रामा डिपार्टमेंटमध्ये जावे लागते, अशी माहिती मुंबई, नाशिकच्या खेळाडूंनी दिली. तीन दिवस नॉनव्हेज देणार आहे. सकाळी चहा, नाष्टा, दुपारी जेवण त्यानंतर चहा व रात्री जेवण देतात.
पाेटभर जेवण तरी द्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा दिल्या नाहीत, त्यात कुठलाही बदल झाला नाही. उलट जेवणाबाबत माेठ्या प्रमाणात असुविधा आहेत. भाज्या तिखट असून भातही कच्चा दिला जात आहे. त्यामुळे पाेटभर जेवण करता येत नाही. -सोनू यादव, खेळाडू
२० मुलींसाठी एकच स्वच्छतागृह विद्यापीठ प्रशासनाने २० खेळाडू मुलींसाठी एकच स्वच्छतागृह वापरण्यासाठी दिले आहे. त्यामुळे मुलींची गैरसाेय हाेत आहे. अंकिता चव्हाण, खेळाडू, नाशिक
मैदानाजवळ स्वच्छतागृह हवे मैदानाजवळच स्वच्छतागृह उभारायला हवे हाेते. परंतु, विद्यापीठ प्रशासनाने तसे केले नसल्यामुळे २१२० विद्यार्थी खेळाडूंची गैरसोय होत आहे. त्यांना लघुशंकेसाठी दूर जावे लागत असून काहींची तारांबळ उडत आहे. -स्मित तळेकर, खेळाडू
विद्यार्थ्यांच्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी समित्यांची नियुक्ती विद्यार्थ्यांच्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने विविध समित्या स्थापन केल्या आहेत. त्यातील प्रत्येक समितीकडे विद्यार्थ्यांची गैरसाेय हाेऊ नये यासाठीची जबाबदारी दिली आहे.-दयानंद कांबळे, क्रीडा संचालक
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.