आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आकलन:आयुष्यातील संघर्षादरम्यान आपल्याला अनेक टूल मिळतात; करिअरमध्ये बदल करण्यास होतो उपयोग

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगात न्यू नॉर्मलबाबत अनेक चर्चा होत आहेत. कोविडनंतरच्या वेळेचा नवनवीन गोष्टी शिकण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. लोक करिअर बदलत आहेत. एवढेच नव्हे तर लोक करिअर बदलण्यासाठी स्वत:मध्ये पूर्ण बदल करत आहेत. या दरम्यान ते संघर्षातील सर्वात प्रभावी वेळ लक्षात ठेवत नाहीत. यानंतर ते निराशाचे बळी ठरतात.

संघर्षाच्या काळात आपल्याला अशी काही कौशल्य मिळतात, जेणेकरून करिअरमध्ये बदल करण्यात त्याची मदत मिळते. येल विद्यापीठातील माजी प्राध्यापक लिपमन यांच्या पुस्तकातील ही बाब समोर आली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, आयुष्यात काही नवीन करण्याच्या काळात संघर्ष केवळ आवश्यकच नाही तर उपाय शोधण्याचे महत्त्वाचे कौशल्य आहे. लिपमन यांना दिसून आले की, सर्वांनी करिअर आणि आयुष्यातील बदलात जवळपास एकसारखा मार्ग निवडला. लिपमन त्यास रिइन्व्हेंशन रोडमॅप संबोधतात. सर्च, स्ट्रगल, स्टॉप आणि सोल्यूशन याचे चार टप्पे आहेत. या भागांतून टप्प्याटप्प्याने व्यक्ती पुढे जातो. आपण केवह सर्च व सोल्यशनवर भर देतो. म्हणजे, पनर्निर्मिती आणि परिणामाची चिंता करतो. हा मानवी स्वभाव आहे की, संधर्षांकडे डोळेझाक करतो. आपला बहुतांश वेळ निष्कर्षावर राहतो.

याला सिंड्रेला मिथक म्हणतात. आयुष्यातील मोठे बदल अचानक आणि योगायोगाने होतात,असे मानले जाते.उदा. मार्क झुकेरबर्ग कॉलेज अर्धवट सोडून अब्जाधीश होणे.

बदलाच्या स्थित्यंतरात काही ना काही चांगले होते संघर्षादरम्यान असे वाटू शकते की, तुम्ही अद्यापही उभे आहात, पुढे जात नाहीत. तुम्ही पुढे जात असता, जाणीव होत नसते. मात्र, काही ना काही चांगले होते असते. हे तुम्हाला पुढील उद्दिष्टापर्यंत नेत असते.