आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराद्वारकेची मूर्ती एकनाथा घरी । पाणी वाहे हरि कावडीने ॥१॥ श्रीखंड्या चंदन उगाळूनि करी । वस्त्र गंगातीरी धूत असे ॥२॥ सेवेसी तत्पर उभा ठायी ठायी । देवपूजेसमयी तिष्ठतसे ॥३॥ निळा म्हणे देव रावे ज्याचे घरी । दत्तचौपदार करीतसे ॥४॥ या अभंगाप्रमाणे स्वत: भगवंताने शांतिब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या वाड्यातील रांजणात पाणी भरले. याच तुकाराम बीजपासून गुरुवार, ९ मार्चपासून संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्ठीस औपचारिक प्रारंभ झाला. दुपारी साडेबारा वाजता नाथ वाड्यातील रांजण भरण्यास सुरुवात झाली. नाथषष्ठीवर अवकाळी पावसाचे सावट असल्याने यात्रेदरम्यान शहरातील विविध धर्मशाळा, महाविद्यालय, शाळेमध्ये वारकऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी संतोष आगळे यांनी दिली.
संत तुकाराम महाराज बीजेच्या दिवशी पवित्र रांजणाची महापूजा नाथवंशज विठ्ठल महाराज बुवा गोसावी, रावसाहेब महाराज गोसावी, सरदार महाराज गोसावी, उमाकांत महाराज गोसावी, हरिपंडित गोसावी, शुभम गोसावी, पुष्कर महाराज गोसावी, नंदकिशोर महाराज गोसावी, विनीत गोसावी आणि नाथ वंशज यांच्या प्रमुख उपस्थिती करण्यात आली. याप्रसंगी नीलिमा गोसावी, उषाताई गोसावी, अनुराधा गोसावी, प्राजक्ता गोसावी यांच्यासह पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने नाथ भाविकांची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.