आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपंचमी विशेष:वर्षभरात 20 सर्पमित्रांनी पकडले 2,576 साप ; एकालाही विमा कवच, मानधन नाही

औरंगाबाद / रोशनी शिंपी16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

साप चावल्यावर ना उपचारांचा खर्च मिळतो ना साप पकडण्याचे मानधन. तरीही २० सर्पमित्रांनी वर्षभरात २,५७६ सापांना जीवदान दिले. धामण, घोणस, नाग, तस्कर, अजगर या जातींचे साप शहरात सापडले. विशेष म्हणजे साप पकडताना शहरातील दोन सर्पमित्रांच्या जिवावर बेतले होते तरीही त्यांनी साप पकडून ते सुरक्षित ठिकाणी साेडण्याचे काम साेडले नाही. मागील चार महिन्यांत ३२० जणांना साप चावल्याच्या घटनाही समाेर आल्या आहेत.

उन्हाळ्याचा शेवट आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणात साप निघतात. त्यांच्यापासून जिवाला धोकाही होतो. पण तरीही सर्पमित्र शहरवासीयांचे सापापासून रक्षण करत आहेत. अन्नसाखळीत साप अत्यंत महत्त्वाचा आहे. शेतातील उंदरांची शिकार करून साप ३० टक्के धान्याचे नुकसान होण्यापासून वाचवतात. त्यामुळे नागपंचमीला सापाचे पूजन करण्याची प्रथा आहे. शहरातील सर्पमित्रांनी वन विभागाकडे आणि संबंधित मंत्र्यांकडे स्टिक, गम बूट आणि मानधनाचीही मागणी केली. मात्र, त्यांना काेणतेही मानधन दिले जात नाही. एकीकडे सर्पमित्र साप पकडण्यासाठी संबंधित कुटुंबाकडून कोणतेही मानधन घेत नाहीत. दुसरीकडे वन विभाग त्यांना ना साप पकडण्याचे व जंगलात सोडण्याचे मानधनही देत नाही. सर्पमित्र स्वखर्चाने सापांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडतात.

२४१ महिलांवर उपचार
शहरातील घाटी आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात गेल्या चार महिन्यांत ४२० जणांवर साप चावल्याने उपचार करण्यात आले. यात १७९ पुरुष तर २४१ महिलांचा समावेश आहे.

अँटी स्नेक व्हेनम गरजेची
साप चावलेल्या रुग्णांना शहरातील रुग्णालयात आणण्यापूर्वी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रातच अँटी स्नेक व्हेनम देणे महत्त्वाचे आहे. साप चावल्यापासून पहिल्या दोन तासांत हे इंजेक्शन दिल्यास पुढील सर्व गुंतागुंत टाळता येतात. गंभीर झालेल्या रुग्णांना रक्त पातळ होणे, काही वेळा गाठी होणे, किडनीवर गंभीर प्रकार होताना दिसतात.

बातम्या आणखी आहेत...