आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी बाप्पा आणि मी:गणेशोत्सवानिमित्त खास बालभक्तांसाठी! 'दिव्य मराठी'ला 29 ऑगस्टपर्यंत पाठवा मुलांचे​​​​​​​ व्हिडिओ

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिव्य मराठी अ‍ॅप आपल्यासाठी घेऊन आले आहे बाप्पा आणि मी. आपल्या घरातील मुलांना गणेशोत्सव आणि बाप्पांबद्दल काय वाटतं, शेअर करा त्यांचे अनुभव आणि आम्ही ते दिव्य मराठी अ‍ॅपवर प्रसिद्ध करू.

काय करावे लागेल

आपल्या मुलाचा व्हिडिओ दिव्य मराठी अ‍ॅपवर पब्लिश करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. तुमच्या मुलाचे वय 10 किंवा त्यापेक्षा कमी असावे. सोबतच व्हिडिओ उभ्या फॉरमॅटमध्ये किमान 20 सेकंद ते कमाल दीड मिनिटांपर्यंतचा असावा. यात आपल्या चिमुकल्याचे गणपती बाप्पांबद्दलचे अनुभव, किस्से, आरती किंवा श्लोक इत्यादी पाठवता येईल. त्यातील निवडक व्हिडिओ आम्ही 31 ऑगस्टपासून 10 दिवस रोज दिव्य मराठी अ‍ॅपवर प्रसिद्ध करणार आहोत.

इतर अटी आणि नियम...

  • ज्या मुलाचा व्हिडिओ पाठवणार आहात त्याचे वय 10 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असावे.
  • व्हिडिओ व्हर्टिकल (मोबाईल उभा ठेवून) फॉरमॅट मध्येच शूट करून पाठवावा.
  • व्हिडिओ किमान 30 सेकंद आणि कमाल दीड मिनिटांचा असावा.
  • व्हिडिओमध्ये कुठलेही लोगो किंवा वॉटरमार्क असू नये.
  • व्हिडिओची गुणवत्ता योग्य नसल्यास तो रिजेक्ट केला जाऊ शकतो.
  • 29 ऑगस्टनंतर येणाऱ्या व्हिडिओचा विचार केला जाणार नाही.
  • व्हिडिओ पाठवणारी व्यक्ती दिव्य मराठी किंवा दैनिक भास्कर समूहाशी संबंधित असू नये.
  • व्हिडिओ निवडण्याचे आणि प्रसिद्ध करण्याचे सर्व अधिकार दिव्य मराठीकडे असतील.

तर मग आताच तुमच्या मुला/मुलीचे नाव, वय, पत्ता, तुमचा मोबाइल क्रमांक इत्यादी माहितीसह एक व्हिडिओ dvmbappaanime@gmail.com या ई-मेल आयडीवर पाठवा.

बातम्या आणखी आहेत...