आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:शाळा बंदमुळे ई-लर्निंग साहित्याचे नुकसान, उंदीर आणि घुशींचा ग्रामीण भागात धुमाकुळ; 493 शााळांची पावसामुळे पडझड, 15 कोटींच्या दुरुस्तीचा प्रस्ताव

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनामुळे मागील आठ महिन्यांपासून शिक्षक, मुख्याध्यापक शाळेत गेलेच नाहीत. त्यामुळे शाळांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे.

कोरोना लॉकडाऊनमुळे मागील आठ महिन्यांपासून शाळा बंद आहेत. तसेच यंदा अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ४९३ शाळांची पडझड झाली आहे. यासाठी शिक्षण विभागाकडून १५ कोटींचा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. तसेच शाळाबंदमुळे ई-लर्निंगच्या साहित्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासाहित्यांची तपासणी करणे व शाळा स्वच्छतेसाठी शिक्षकांना आता आठवड्यातून दोन वेळा शाळेत जाण्याचे आदेश शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत.

कोरोनामुळे मागील आठ महिन्यांपासून शिक्षक, मुख्याध्यापक शाळेत गेलेच नाहीत. त्यामुळे शाळांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. जिल्हा परिषद, ग्रामपंचायत व लोकसहभागातून जिल्ह्यातील बहुतांश शाळा डिजिटल करण्यात आल्या आहेत. अनेक शाळांमध्ये एलसीडी, संगणक, सेटटॉप बॉक्स असे ई-लर्निंगचे साहित्य आहे. तब्बल आठ महिन्यांपासून शाळा बंद असल्यामुळे डिजिटल व ई-लर्निंग साहित्य धूळखात पडून आहे. हे साहित्य वापरात नसल्यामुळे नादुरुस्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे साहित्य बंद असल्यामुळे उंदीर व घुशींमुळे देखील या साहित्यांचे नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे शिक्षकांना आता आठवड्यात दोन वेळा शाळेत जाणे बंधनकारक करण्यात आले आहे. गावातील शाळा व्यवस्थापन समितीच्या मदतीने शाळांची स्वच्छता करणे, संगणक, एलसीडी, तथा ई-लर्निंगचे साहित्याची तपासणी करण्याच्या सूचना शिक्षण विभागातर्फे देण्यात आल्या आहेत.

१५ कोटींचा प्रस्ताव शाळा दुरुस्तीसाठी
कोरोना लॉकडाऊनमुळे शाळा बंद असल्याने शिक्षकांन शाळेत जाता आले नाही. यंदा अतिवृष्टीमुळे शाळांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. जिल्ह्यातील तब्बल ४९३ शाळांनी दुरुस्तीसाठी शिक्षण विभागाकडे प्रस्ताव दाखल केले आहेत. त्यामध्ये छताची पत्रे उडून जाणे, खिडक्या दरवाजे नादुरुस्त, किचनशेड गळणे, स्लॅबचे प्लास्टर खाली पडणे, उंदीर, घुशींमुळे फरशी उखरली , स्वच्छतागृहांच्या भींतीची पडझड, छतातून पाणी गळणे यासह विविध कारणे देण्यात आलेली आहेत. या दुरुस्तीसाठी शिक्षण विभागाकडून १५ कोटींचा प्रस्ताव शासनाकडे दाखल केला आहे.