आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:डोंगरगाव परिसरात जखमी अवस्थेत सापडला सर्प गरूड, युवकांनी केले वन विभागाच्या हवाली, वन विभागाच्या निगरानीखाली उपचार सुरु

हिंगोलीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

 कळमनुरी तालुक्यातील डोंगरगाव शिवारात सोमवारी (ता. २२) दुपारी जखमी अवस्थेत आढळून आलेल्या सर्प गरूड या पक्षाला युवकांनी पकडून वन विभागाच्या हवाली केले आहे. या पक्षाच्या एकाबाजूच्या पंखाला जखम झाल्यामुळे तो उडू शकत नसल्याचे पाहणीमध्ये आढळून आले आहे. त्यानंतर त्याच्यावर हिंगोली येथे उपचार करण्यात आले आहे.

डोंगरगाव शिवारातून आखाडा बाळापूरचे उपसरपंच विजय बोंढारे, गोविंद बोंढारे,  बारकू पाटील, राजू सेवनकर, नरेश देशमुख, विशू बोंढारे, सतीष शिंदे आदी तरूण जात होते. यावेळी त्यांना एका ठिकाणी मोठ्या आकाराचा पक्षी फडफडत असल्याचे दिसून आले. प्रथमच हा पक्षी परिसरात आढळून आल्यामुळे या तरुणांनी कुतुहलापोटी त्याच्या जवळ जाऊन पाहणी केली. मात्र त्याचा एक पंख कापल्या गेल्या मुळे तो जखमी अवस्थेत असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यास उडता येत नसल्याचे दिसून आल्यानंतर तरुणांना त्यास पाणी पाजले. त्यानंतर याबाबतची माहिती विभागीय वन अधिकारी केशव वाबळे, वन परिक्षेत्र अधिकारी विश्‍वनाथ टाक, प्रीया सावळे यांना दिली. त्यानंतर विश्‍वनाथ टाक, प्रीया सावळे यांच्या पथकाने डोंगरगाव शिवारात येऊन त्या पक्षाला ताब्यात घेतले आहे. त्यानंतर त्यास हिंगोली येथे आणून पशुवैद्यकिय दवाखान्यात उपचार केले आहे. त्यानंतर त्यास त्याचे खाद्यही दिले आहे. तुर्तास त्याच्यावर उपचार करून त्याच्या पंखात बळ आल्यानंतर त्यास जंगलात सोडले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

या संदर्भात विभागीय वन अधिकारी केशव वाबळे, वन परिक्षेत्र अधिकारी विश्‍वनाथ टाक, प्रिया सावळे यांनी सांगितले की, सदरील पक्षी सर्प गरूड असून साप, पाल, बेडूक, सरडे, उंदीर, रानकोंबड्या या सारखे प्राणी खातो. त्याच्या खाद्यात विषारी सापांचा समावेश असल्याने त्यास सर्प गरूड असे म्हटले जाते. जंगलातल्या मोकळ्या जागांच्या कडेला असलेल्या झाडांवर बसून तो सरपटणाऱ्या प्राण्यांच्या हालचालीची टिपतो. त्यानंतर भक्ष्यावर झेप घेऊन अवघ्या काही वेळातच पंजामध्ये भक्षाला पकडून जायबंदी करून त्याचे तुकडे करून खातो. संपूर्ण महाराष्ट्रात या सर्प गरुडाचे वास्तव्य आहे. जंगलातल्या एखाद्या उंच झाडावर फांद्या तसेच काडी, मध्यम लाकूड गोळा करून तो घरटे बांधतो. आकाशात उडणारा सर्पगरुड त्याच्या पंखांमध्ये असलेल्या पांढऱ्या पट्ट्यांवरून सहज ओळखू येतो. आकाशात उंचीवर घिरट्या घालत असल्याचे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...