आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खा. सुजय विखेंच्या उड्डाणपूल श्रेयवादावरून शिंदेसेना नाराज:19 नोव्हेंबरला लोकार्पण, श्रेयवादावरून टीकास्त्र

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद ते पुणे रस्त्यावर अहमदनगर येथे उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे उद्घाटन (लोकार्पण) १९ नोव्हेंबर रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होत आहे. खासदार सुजय विखे पाटील यांनी नुकतीच या पुलाची पाहणी करून लोकार्पणाची तारीख जाहीर करून टाकली. त्यामुळे बाळासाहेबांच्या शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी नाराज झाले आहेत. त्यांनी श्रेयवादाचा मुद्दा उपस्थित करत टीकास्त्र सोडले आहे. विखे यांनी उड्डाणपुलासाठी प्रयत्न करणाऱ्यांचे आभार मानले. त्यात त्यांनी तत्कालीन शिवसेनेचे दिवंगत नेते अनिल राठोड यांचे नाव टाळले. यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून सोशल मीडियात टीका टिप्पणी सुरू झाली आहे. ‘खासदार साहेब, तुम्ही विसरलात का?’ असा सवाल करत त्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे. उद्धवसेनेने पुन्हा उड्डाणपुलाच्या पाहणीचा कार्यक्रम ठेवला. खऱ्या लोकांना का टाळले जाते, असा सवाल सोशल मिडिआवर करत शिंदेसेनेने विखे यांच्याविषयी टीकास्त्र सोडले आहे.

बातम्या आणखी आहेत...