आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात सभा:एमआयएमचे अध्यक्ष खा. असदुद्दीन ओवेसी यांची 25 जूनला सभा

औरंगाबाद3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीनचे पक्षप्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांची २५ जून रोजी जाहीर सभा होणार आहे. आमखास मैदान येथे संध्याकाळी ७ वाजता होणाऱ्या या सभेच्या स्थळाची पाहणी प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. गफार कादरी व पोलिस अधिकाऱ्यांनी केली. कोणत्या ठिकाणी स्टेज राहील, आसन व्यवस्था, पार्किंग कोणत्या ठिकाणी व कशी असेल याविषयी बुधवारी चर्चा केली. कादरी म्हणाले, आम्ही सायंकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत सभेची परवानगी मागितली आहे. या वेळी पोलिस उपायुक्त दीपक जिरे, पोलिस निरीक्षक प्रशांत पोतदार, सोहेल जलील यांच्यासह माजी नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...