आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इको फ्रेंड:20 फूट उंच झोपाळ्यावर ‘कुलस्वामिनी’चा इको फ्रेंडली महागणेशाल

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दरवर्षी वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या सिडको एन-६ येथील कुलस्वामिनी प्रतिष्ठानने यंदा गणेश उत्सवात जमिनीपासून २० फूट उंचावर एका भव्य झोपाळ्यावर इको फ्रेंडली महागणपतीची निर्मिती केली आहे. या अनोख्या गणेशाच्या निर्मितीसाठी २०० रोपांचे ट्रे, ९० किलो भंगारातील स्टील, ३० किलो गहू, २० किलो कोकोपीठ, दोन हजार फूट दोरी, १०० फुलांची रोपटी, सोलार पॅनल, दोन मोठे आरसे आदी साहित्याचा वापर करण्यात आला. या उपक्रमातून ‘सोलार वापरा-वीज वाचवा’, ‘रेन हार्वेस्टिंग करा’, ‘शेततळी बांधा-पाणी वाचवा’ असा संदेश देण्याचा प्रयत्न असल्याची माहिती कुलस्वामिनी प्रतिष्ठानचे विलास कोरडे यांनी दिली.

यांनी साकारला देखावा
या उपक्रमाची निर्मिती व संकल्पना विलास कोरडे, अलका कोरडे यांची आहे. त्यांना प्रल्हाद गायकवाड, चंद्रमुनी जायभाये, अनिल गावंडे, पल्लवी कुलकर्णी, अ. ल. कुलकर्णी , दत्ता जीवने, उषा पाटील, विशाल पेटले, ज्ञानेश्वर सागरे यांनी हा देखावा पूर्ण करण्यासाठी सहकार्य केले.
कंटेंट : गिरीश काळेकर,
फोटो : रवी खंडाळकर

प्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर
या झुल्याच्या खाली १५ बाय २० फूट आकाराचे एक तळे तयार करण्यात आले आहे. वर तयार केलेल्या भव्य प्रतिमेचे खालील तळ्यात सुंदर प्रतिबिंब दिसते.

आरशातही खुलून दिसतो बाप्पा
प्रतिमेखालील तळ्याच्या बाजूला दोन्ही बाजूंनी दोन मोठे आरसे लावण्यात आले आहेत. झुल्यावरील देखाव्याचे प्रतिबिंब त्यात उमटेल अशी त्याची रचना करण्यात आली आहे. या दोन्ही आरशांमध्ये याप्रमाणे गणपतीचे प्रतिबिंब दिसून येते.

बातम्या आणखी आहेत...