आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्धे आकाश:महिलांसाठी आर्थिक संधी वाढवायला हव्या होत्या

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बचत गटांच्या माध्यमातून केलेली गुंतवणूक हा अर्थसंकल्पाचा महत्त्वाचा आयाम होता. आज हे नेटवर्क खूप मोठे झाले आहे आणि त्यात अनेक शक्यता आहेत. परंतु, अर्थसंकल्पात प्रामुख्याने उत्पादन आणि उत्पादक कंपन्यांवर लक्ष केंद्रित केले आहे, ते महत्त्वाचे आहे, परंतु आपण रोजगारनिर्मितीवर लक्ष केंद्रित केले नाही तर त्याची क्षमता मर्यादित राहील. त्याच वेळी उपजीविका आणि इतर एंटरप्राइझशी संबंधित विकासासदेखील समर्थन दिले पाहिजे.

महिलांसाठी आर्थिक संधी वाढवण्यासाठी भांडवली गुंतवणूक कशी केली जाईल, हे बजेटमध्ये स्पष्ट केलेले नाही. डिजिटल परिवर्तनाच्या संदर्भात आपल्याला हस्तक्षेप करण्याची गरज आहे. पण, आजही देशातील ८ कोटी महिलांकडे स्मार्टफोन नाहीत, त्यामुळे त्यांना इंटरनेट सुविधा वापरता येत नाही, ही चिंता आपण अर्थसंकल्पात पाहिली नाही. यामुळे त्यांना भविष्यातील संधींचा लाभ घेता येणार नाही. सामाजिक कल्याणकारी योजनांबाबत सांगायचे तर, त्यामध्ये या वस्तुस्थितीचा पुरेसा उल्लेख नव्हता की, स्वयंसहायता गटांच्या सक्षमीकरणापलीकडे आपल्याला हे समजून घेणे आवश्यक आहे की, आरोग्यसेवा आणि महिलांवर अधिक केंद्रित सामाजिक-सेवांच्या दिशेने अधिक उपाय कसे शोधायचे? महिलांच्या कल्याणासाठी काम करण्यासाठी आवश्यक असलेली माहिती आपण कशी मिळवू, त्यांच्या गरजा कशा ओळखू, जेणेकरून त्यांच्या समस्यांवर अधिक चांगले उपाय शोधता येतील, हे आपण अर्थसंकल्पात प्रतिबिंबित केले पाहिजे. शहरी भागात आणि इतर देशांमध्ये आपण पाहत आलो आहोत की, गर्भवती महिलांसाठी किंवा प्रसूती रजा घेणाऱ्या महिलांसाठी अनेक सामाजिक-कल्याणकारी योजना आहेत. असे इंडोनेशियामध्ये घडते, दक्षिण आफ्रिकेच्या अनेक भागांमध्येही आहे, आपले सरकारही यातून धडा घेऊ शकते. आपण महिलांना अधिक चांगल्या प्रकारे कसे प्रेरित करू शकतो याचा विचार केला पाहिजे, कारण त्या आधीच माता म्हणून आणि कुटुंबाची काळजीवाहू म्हणून नेतृत्वाच्या भूमिकेत आहेत.

जगातील इतर देशांमध्ये, विशेषत: आफ्रिकेत, आपण हेदेखील पाहतो की, सरकार महिलांना चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहित करतात. यामुळेच आज स्त्रिया जमिनीवर सेवा देत असो किंवा लोकांना आरोग्य-सुविधा मिळवून देण्यासाठी मदत करत असो किंवा बचत गटांमध्ये काम करत असो, आपल्याला परिणामावर आधारित वृत्ती अंगीकारण्याबाबत विचार करावा लागेल आणि चांगले काम करणाऱ्या महिलांना इन्सेंटिव्ह द्यावा लागेल.

अजेता शहा संस्थापक, फ्रंटियर मार्केट्स

बातम्या आणखी आहेत...