आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराघरकुल निविदा घोटाळ्याची ईडीकडून चौकशी सुरू आहे. गुन्हे शाखेकडूनदेखील या निविदेतील बोगस प्रकरणांचा तपास करण्यात येत आहे. मनपा स्तरावरील चौकशीतून एकाच आयपी अॅड्रेसवरून कंत्राटदार कंपन्यांनी साखळी करून निविदा भरल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच या निविदेतील घोटाळ्याच्या शंकेस वाव मिळाला. त्यामुळे आता आयपी अॅड्रेसची तपासणी केली जाईल, असे प्रशासकांनी सांगितले.
घरकुल प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेत झालेला घोटाळा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला आहे. त्यावर राज्य सरकारने स्वतंत्र चौकशी समिती नेमून त्यांच्या अहवालावरून प्रकल्पाची निविदा प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ईडीने कागदपत्रे ताब्यात घेतली. जॉइंट व्हेंचरमध्ये असलेल्या कंपनीने निविदा सादर केली होती. त्यातील ज्ञाती या कंपनीच्या प्रतिनिधींनी निविदेच्या कागदपत्रांवरील स्वाक्षऱ्या आमच्या नसल्याचे म्हटले. प्रारंभी मनपाच्या तपासणीतून एकाच आयपी अॅड्रेसवरून समरथ कन्स्ट्रक्शनसह अन्य कंपन्यांनी साखळी करून निविदा भरल्याचे समाेर आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.