आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युद्धाचा भडका:साेयाबीनच्या नुकसानीमुळे खाद्यतेलाचे भाव वाढले ; 15 ते 20 रुपयांची अचानक वाढ

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जानेवारी ते मे महिन्यापर्यंत वाढलेले तेलाचे भाव मागील जून महिन्यात घसरले होते. मात्र सध्या रशिया-युक्रेन युद्धाचा भडका आणि राज्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे झालेले नुकसान यामुळे खाद्यतेलाचे भाव अचानक १५ ते २० रुपयांनी वाढले आहेत. मलेशिया आणि इंडोनेशियातून भारतात तेल आयात केले जात होते. मात्र काही महिन्यांपूर्वी आयात बंद झाल्याने करडई, शेंगदाणे, सूर्यफूल, पामतेलाचे भाव गगनाला भिडले होते. सामान्य माणसाच्या खिशाला परवडणारे पामतेलही आवाक्याबाहेर गेले होते. ही भाववाढ कमी करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आयात शुल्क हटवले. मे महिन्यात मलेशिया आणि इंडोनेशियातून पामतेलाची आयात सुरू केली. यामुळे बाजारात तेलाचे भाव कमी झाले हाेते. मात्र सध्याच्या स्थितीत अतिवृष्टीने सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. तसेच रशिया-युक्रेन युद्धामुळे बाजारात पामतेल, सूर्यफुलाची आयात कमी झाली. याचा परिणाम सध्या तेलाच्या किमती १५ ते २० रुपयांनी वाढल्याची माहिती औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय कांकरिया यांनी दिली.

लग्नसराईतही जास्त दर सूर्यफुलाचे भाव १५० रुपये असताना गुरुवारी १६४ ते १६८ रुपये प्रतिलिटर झाले. पामतेल ९७-९८ रुपयांवरून १०७ रुपये झाले आहे. सोयाबीन तेलाचा भाव १८० रुपयांवरून १४२ वर आले हाेते. तेसुद्धा आता वाढले आहेत. शहरात पामतेल व सोयाबीन तेलाची मागणी पाहता रोज २ ते ३ टँकर येणे गरजेचे आहे. मात्र, ते येत नाही. लग्नसराईतही भाववाढ कायम राहील, असे व्यापारी बबन चुडीवाल यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...