आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूचना:शाळांमध्ये वन्यजीव अन् खगोलशास्त्र मंडळाद्वारे पर्यावरण, अंतराळाची माहिती;विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरांचे आदेश

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यार्थ्यांना शालेय स्तरावरच नियमित पाठ्यपुस्तकातील अभ्यासाबराेबर अवकाशातील घटना, घडामोडी सचित्र पाहता येणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन, वन्य जिवाणूंचे महत्त्व आणि प्राण्यांबद्दल आवड निर्माण व्हावी यासाठी प्रत्येक प्राथमिक शाळेत वन्यजीव मंडळ (वाइल्डलाइफ क्लब) आणि खगोलशास्त्र मंडळ स्थापन करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शिक्षण विभागाला पत्राद्वारे दिल्या आहेत. हा उपक्रम समग्र शिक्षाअंतर्गत प्राथमिक शाळांनी राबवावा, असे शिक्षणाधिकाऱ्यांच्या बैठकीत केंद्रेकरांनी सांगितले.

जैवविविधतेचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी प्राथमिक शाळांमध्ये वन्यजीव मंडळ स्थापन करणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्यांना खगोलशास्त्राची ओळख व आवड निर्माण व्हावी या हेतूने शाळांत खगोलशास्त्र क्लब स्थापन करण्याच्याही सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्या. मुलांना पर्यावरण संवर्धनाची आवड निर्माण व्हावी तसेच खगोलशास्त्राविषयी आवड निर्माण होऊन संशोधन वृत्ती वाढवावी हा या मंडळ स्थापनेमागील उद्देश असल्याचे शिक्षिका सुवर्णा गाडेकर, सुनीता होनवणे यांनी सांगितले. मुलांना पर्यावरण संवर्धनाची तसेच खगोलशास्त्राविषयी आवड निर्माण होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

बातम्या आणखी आहेत...