आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भविष्यवेध:शैक्षणिक विकासातून निर्माण होईल ‘आत्मनिर्भर भारत’ : अतुल सावेंचे मत

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक विकासासाठी अद्ययावत यंत्रसामग्री आणि सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच जागतिक दर्जाचा भविष्यवेध विविध उपक्रमांतून घेतला जात आहे. यामुळे शैक्षणिक विकासातून ‘आत्मनिर्भर भारत’ निर्माण करण्याचे स्वप्न पूर्ण होईल, असे प्रतिपादन राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी रविवारी केले.

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, निपुण भारत, अधिगम सर्वेक्षण व स्पोकन इंग्लिश व प्रौढ साक्षरता या विषयावर विभागीय स्तरावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी ते बोलत होते. आश्रमशाळेतील विद्यार्थी सर्वगुणसंपन्न, तसेच जागतिक स्पर्धेत आपले अस्तित्व निर्माण करणारा व्हावा यासाठी शासनामार्फत विद्यार्थ्यांना टॅब, निवास व भोजन सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. परदेशात शिक्षण घेण्यासाठी ‘महाज्योती’च्या माध्यमातून शिष्यवृत्ती, प्रशिक्षण आणि परदेशात शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली जात आहे,असेही त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...