आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्देश:महिलांच्या आरोग्य, पोषण योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिलांच्या आरोग्य व पोषणासंदर्भात असणाऱ्या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करा, अशा सूचना जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी केल्या. गर्भसंस्कार व चला पौष्टिक जेवण करूया या उपक्रमाची अंमलबजावणी जिल्ह्यात करण्यात येणार आहे. यासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश आरोग्य विभाग व संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.

जिल्ह्यामध्ये प्रसूतिपूर्व लिंगनिदान चाचणी प्रतिबंध समितीसह विविध योजनांची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दयानंद मोतीपोवळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके, अन्न व औषध प्रशासन विभागाचे दयानंद पाटील, सुमन प्रकल्पाच्या समन्वयक प्रज्ञा सोनवणे, एनपीसीडीएसचे जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ. जावेद कुरेशी यांची उपस्थिती होती. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात स्थानिक पातळीवर अन्नधान्यातून पौष्टिक जेवण हा उपक्रम राबवण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. २०२३ हे वर्ष “तृणधान्य वर्ष’ म्हणून साजरे करण्यात येणार आहे. निरोगी आयुष्यासाठी आहारात तृणधान्याचा समावेश आणि स्थानिक पातळीवरील उत्पादित होणाऱ्या अन्नधान्याचा वापर करून सकस व पाैष्टिक आहार माता, बालक व प्रत्येक नागरिकांना मिळावा. वयोगटानुसार आवश्यक अन्नघटक याविषयी मार्गदर्शन व जाणीव जागृती करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्याच्या सूचना या वेळी केल्या.

बातम्या आणखी आहेत...