आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरवणुकीत कान व हृदय सांभाळा:110 डेसिबलच्या आ‌वाजाचा शरीरावर परिणाम, 5% होतात बहिरे, 2% रुग्णांना हृदयविकार

रोशनी शिंपी | औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सामान्यत: ७० ते ८० डेसिबलचा आवाज ७ ते ८ तास कामावर पडला तरी मानवी श्रवण यंत्रणा ती सहन करू शकते, मात्र ११० किंवा त्यापेक्षा अधिक डेसिबलच्या आवाजाने बहिरेपणा येतो. विसर्जन मिरवणुकीतील डिजेचा आवाज ११० ते १७० डेसिबलचा असल्याने मिरवणुकीनंतर ५ टक्के रुग्ण बहिरेपणाची तर २ टक्के रुग्ण हृदयविकाराची समस्या घेऊन येत असल्याची माहिती तज्ज्ञ डॉक्टरांनी दिली. मिरवणुकीत गणेश भक्तांनी काय काळजी घ्यावी यावर "दिव्य मराठी'ने त्यांच्याशी साधलेला हा संवाद.

मिरवणुकीत बेधुंद होऊन अनेकजण अगदी डीजेपासून फूटभर अंतरावर तासनतास नाचतात. त्यामुळे काहींना टेंपररी सेंसर न्यूरल लॉस अर्थात काही वेळासाठी बहिरेपणा येतो. डीजेपासून लांब गेल्यावर काही मिनिटांनी ऐकू येऊ लागते. तर काहींना नॉइज इंड्यूस डेफनेस अर्थात कायमचा बहिरपणाही येतो. दरवर्षीच्या विविध मिरवणुकांमुळे माझ्याकडे ५ ते ८ रुग्ण बहिरेपणाची तक्रार घेऊन येतात. खूप जोरात आवाज पडद्यावर पडल्याने व्हायब्रेशन ऑफ एअर ड्रममुळे झोप जाणे, रक्तदाब वाढणे, आत्मपित्त, चक्कर, मळमळ, उलट्या असाही त्रास आवाजामुळे होतो. बहिरेपणा आल्यास तत्काळ उपचाराने दिलासा मिळू शकतो.

हृदय रुग्णांनी घ्यावी ही काळजी तक्रारी : डिजेच्या आवाजाने हृदयाची धडधड, रक्तदाब वाढतो. यामुळे हृदयविकार होण्याच्या तक्रारी पुढे आलेल्या आहेत. धोका : साधारणत: दोन टक्के रुग्ण मिरवणुकीनंतर छातीत दुखत असल्याच्या तक्रारी किंवा थेट हृदयविकाराचा झटका आल्याच्या तक्रारी घेऊन येतात. काळजी : सामान्य लोकांना मोठ्या आवाजाचा फार त्रास जाणवत नाही. मात्र कमजोर हृदय असणाऱ्यांचे ठोके अनियंत्रित होऊन हृदय बंद पडू शकते.

व्यसनाधीन लोकांनी सावध राहावे सिगारेट, तंबाखु सेवनाचे व्यसन असलेल्यांनी तीव्र आवाजासमोर थांबणे टाळावे. अगदी बेभान होऊन नाचल्यास हृदयावर ताण पडू शकतो. सामान्यत: मिरवणुकीनंतर हृदयरुग्णांचे प्रमाण वाढते. डॉ. प्रशांत उदगीरकर, हृदयविकार तज्ज्ञ

बातम्या आणखी आहेत...