आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक संघटना तोडग्याच्या शोधात:ग्रामविकासकडून मुख्यालय सक्तीचा आदेशच रद्द करवून घेण्यासाठी प्रयत्न

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यालयात न राहता जि.प.चे शिक्षक घरभाडे भत्ता घेतात, असा आरोप भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी तीन आठवड्यांपूर्वी केला. त्यावरून औरंगाबादेत शिक्षक संघटनांनी शिक्षक आमदारांच्या नेतृत्वात मोठा मोर्चाही काढला. पण त्यामुळे फारसा फरक पडणार नाही, असे लक्षात आल्यावर काही शिक्षक संघटनांनी ‌‘मुख्यालयात राहणे सक्तीचे’ हा आदेशच ग्रामविकास मंत्रालयातून रद्द करवून घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यामार्फत त्यांनी हा मार्ग शोधला आहे. मात्र, हा आदेश असा रद्द होणार नाहीच.

त्यासाठी राज्य शासनाला धोरण निश्चित करून सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी निर्णय घ्यावा लागेल, असे आमदार बंब यांनी सांगितले. मोर्चाने मूळ प्रश्न सुटणार नाहीत, असे महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना समन्वय समितीच्या लक्षात आले. म्हणून समितीचे प्रदेश अध्यक्ष अरुण जाधव यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला. त्या वेळी फडणवीस परदेशात असल्याने त्यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेण्यास सांगितले. आणि नेमका प्रश्न काय आहे आणि त्यातून काय तोडगा काढता येईल याचा आढावा घ्या, असा निरोप मुनगंटीवारांना दिला. त्यानुसार १३ सप्टेंबर रोजी झालेल्या चर्चेत मुख्यालयातील सक्तीचा शासन आदेश रद्द करणे हाच एकमेव मार्ग असल्याचे निष्पन्न झाले. म्हणून आता ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा करण्याची तयारी सुरू झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...