आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपुरवठा:पाणीटंचाईवर तोडगा विभागीय आयुक्तांचे समान पाणीपुरवठ्यासाठी प्रयत्न ; आठ दिवसांत काही वसाहतींना पाणीपुरवठा होणार

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जलकुंभांवरून वसाहतींना समान पाणीपुरवठा होतो की नाही, हे तपासण्यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी ३१ अधिकाऱ्यांचे पथक स्थापन केले. हे पथक आठवड्यातून दोनदा जलकुंभांची पाहणी करील. ८ जून रोजी औरंगाबादेतील सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याची जबाबदारी विभागीय आयुक्तांकडे सोपवली, त्यानुसार केंद्रेकर पावले उचलत आहेत. जलकुंभांवरूनच मोठी पाणीचोरी होते. शिवाय प्रत्येक वसाहतीला योग्य दाबाने, कालावधीत पाणी मिळत नाही, अशा तक्रारी आहेत. त्या लक्षात घेऊन केंद्रेकरांनी स्थापन केलेले पथक जलकुंभांमध्ये पाणी आणणाऱ्या वाहिन्यांच्या गळत्या बंद करतील. पाणीचोरी रोखण्यासाठी माहिती गोळा करतील. पाणी वितरण व्यवस्थेचे नकाशे तयार करून पाहणी करणार आहेत. वॉर्ड कर्मचारी नागरिकांच्या अडचणी जाणून घेतील. दर सोमवार, गुरुवारी आढावा सादर करावा, असेही आयुक्तांनी त्यांना सांगितले आहे. हे आहेत पथकात नियुक्त केलेले ३१ अधिकारी मनपा उपायुक्त संतोष टेंगळे, राहुल सूर्यवंशी, नंदा गायकवाड, सोमनाथ जाधव, सहायक आयुक्त विक्रम दराडे, डॉ. पारस मंडलेचा, विजय पाटील, कार्यकारी अभियंता एम. बी. देशमुख, भागवत फड. जगदीश मिणियार, शिवाजी शिंदे, सुरेश बेदमुथा, पांडुरंग कुलकर्णी, समीक्षा चंद्राकार, वामन कदम, वीणा सुपेकर, सहायक आयुक्त कुसुम राठोड, विद्या मुंडे, तहसीलदार सुवर्ण पवार, राजेंद्र अहिरे, शशिकांत भोसले. जिल्हा परिषदेचे उज्ज्वला बावके, शिरीष बनसोडे, डॉ. सुनील भोकरे, निवासी उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य, भारत कदम, रामेश्वर रोडगे, तहसीलदार ज्योती पवार आदी. माहिती लपवणाऱ्या मनपा अधिकाऱ्यांवर कारवाई केंद्रेकरांनी मनपाच्या अधिकाऱ्यांना सांगितले की, तुम्ही कोणतीही माहिती लपवू नका. पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे जे काम करणार नाहीत त्यांनी असे समजू नये की त्यांच्यावर कारवाई होणार नाही. अधिकारी कुणी कितीही मोठा असला तरी त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे. मुख्य वाहिनीवरून नळ कनेक्शन घेणाऱ्यांनी उपवाहिनीवरून कनेक्शन घ्यावे. शक्कर बावडीतून काढला दिवसभरात १५० ब्रास गाळ

शहरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण सक्रिय झाले आहेत. त्यांनी दिल्ली गेट, रोजाबाग आणि परिसरातील नागरिकांना शक्कर बावडीतील (हिमायतबाग) पाणी पिण्यासाठी देण्याचे ठरवले आहे. त्यानुसार १४ जून रोजी मोहीम सुरू झाली. पहिल्या दिवशी १५० ब्रास म्हणजे २० ते २५ ट्रक भरेल एवढा गाळ काढण्यात आला. आठ दिवसांत पाणीपुरवठा सुरू होणार आहे. ८ जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबादेत सभा झाली. त्यात त्यांनी टंचाई दूर करण्यासाठी सर्व उपाययोजना करण्याची सूचना केली. सध्या उपलब्ध असलेले पाणी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, असेही सांगितले. त्यानंतर मनपा प्रशासक आस्तिककुमार उर्वरित पान.४ हर्सूल तलावातून १५ एमएलडी पाणी शहागंज, रोजाबागसह जुन्या शहरातील १६ वॉर्डांना हर्सूल तलावातून साडेचार एमएलडी पाणीपुरवठा होत असे. हा पुरवठा दहा एमएलडीपर्यंत वाढवण्यासाठी एमजेपीच्या सल्ल्यानुसार तलावातून जटवाडा रोडने जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत स्वतंत्र वाहिनी टाकली. या वाहिनीला जलशुद्धीकरण केंद्र, हर्सूल तलावाजवळ क्रॉस कनेक्शन दिले आहेत. यातून पाच एमएलडी पाणी वाढेल. मात्र, केंद्रेकरांनी क्रॉस कनेक्शनऐवजी थेट समांतर वाहिनी टाकण्याची सूचना केली आहे. त्यामुळे हर्सूल तलावातून १५ एमएलडी पाणी मिळू शकते, असा अंदाज बांधला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...