आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्बम गीत प्रेक्षकांच्या भेटीला:स्थानिक कलाकारांना निर्मितीत संधी देण्याचा प्रयत्न : डॉ. प्रशांत होर्शीळ

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र चित्रपट महामंडळातर्फे ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींच्या शैक्षणिक समस्या मांडणाऱ्या व महिलांच्या शोषण समस्येवर आधारित नव्या मराठी चित्रपटाची निर्मिती केली जात आहे. यात स्थानिक कलाकारांना संधी देत असल्याचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रशांत होर्शीळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

महामंडळातर्फे अनेक अल्बम साँग, वेबसिरीज, चित्रपटांची निर्मिती करण्यात येत आहे. नव्या वर्षात विविध कलावंतांना आगामी चित्रपट, व्हिडिओ गाण्यामध्ये संधी देण्यात येणार असल्याची माहितीही होर्शीळ यांनी दिली. सिनेअभिनेते संदीप गायकवाड म्हणाले, नव्या मराठी व्हिडिओ साँगची निर्मिती करण्यात येणार आहे. त्याचे चित्रीकरण सुरू झाले आहे. याआधी महामंडळातर्फे अनेक अल्बम साँग, वेबसिरीज, चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे. ते म्हणाले की, मराठी अभिनेते दादा कोंडके यांची व्यक्तिरेखा त्यांनी साकारून ज्येष्ठ अभिनेते दादा कोंडके यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. संदीप गायकवाड यांचा दादा कोंडके व्यक्तिरेखेतील अभिनय महाराष्ट्रभर लोकप्रिय आहे. सुनहरा फिल्म्सतर्फे करण्यात येणाऱ्या नव्या सिनेमाचे दिग्दर्शन डॉ.प्रशांत होर्शीळ करणार आहेत. यासाठी अध्यक्ष आनंद प्रल्हाद शिंदे, कार्याध्यक्ष डॉ.रविराज जाधव, कोषाध्यक्ष विजयकुमार दाभाडे, विकास कापरे पुढाकार घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...