आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महानुभाव पंथ:श्री चक्रधर स्वामींचा अवतार दिन सरकारी सोहळा करण्याचे प्रयत्न

औरंगाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी भाषेचा आद्यग्रंथ लीळाचरित्र लिहून महानुभाव पंथाची स्थापना करणारे श्री चक्रधर स्वामी यांचे यंदा अष्टशताब्दी वर्ष आहे. यानिमित्त त्यांचा जन्मदिवस २९ ऑगस्ट हा शासकीय पातळीवर देखील अवतार दिन म्हणून साजरा व्हावा, अशी मागणी ग्लोबल महानुभाव संघाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका शिष्टमंडळाकडून करण्यात आली.

सुदर्शन महाराज कपाटे महानुभाव यांनी सांगितले, देशभरात पसरलेले अनुयायी श्रीचक्रधर स्वामींचा अवतार दिन साजरा करतात. राज्य शासनाच्या वतीनेही हा अवतार दिन साजरा व्हावा, अशी आमची अपेक्षा आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी लवकरच याबाबत निर्णय घेऊ, अशी ग्वाही दिली. महानुभाव पंथाच्या वतीने सुरू असलेल्या राष्ट्र उभारणीच्या कार्याची माहितीही मुख्यमंत्री शिंदे यांना देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...