आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोजंदारी कर्मचारी:436 कामगारांना सेवेत कायम करण्यासाठी प्रयत्न : कुलगुरू

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ४३६ रोजंदारी कर्मचारी-कामगारांना विद्यापीठाच्या सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्यासाठी स्पेशल ड्राइव्ह घेऊन ही भरती करावी, असे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी भाषणातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर स्पष्ट केले होते.

त्यामुळे भीमशक्ती रोजंदारी कर्मचाऱ्यांनी बुधवारी कुलगुरूंची भेट घेऊन त्यांच्या‌विषयी कृतज्ञता व्यक्त केली. या वेळी कुलगुरू म्हणाले, ‘सर्वांना माझ्या कार्यकाळातच न्याय मिळवून देण्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करणार.’ किरणराज पंडित, सतीश लोखंडे, गणेश खांड्रे, महेश शिंदे, विजय मुळे, दिलीप जाधव, किशोर भिंगारे आदींची उपस्थिती होती

बातम्या आणखी आहेत...