आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:आयशरची दुचाकीला धडक; 3 ठार, सोलापूर-धुळे महामार्गावर कन्नड-अंधानेर बायपासजवळील घटना

कन्नडएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

भरधाव आयशर (टेम्पो) आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. १७) दुपारी सोलापूर-धुळे महामार्गावरील कन्नड-अंधानेर बायपास वळणावर घडली. चाळीसगावहून औरंगाबादकडे जाणारा आयशर टेम्पोने (एमएच २० ईएल ३६४४) कन्नड येथून चाळीसगावकडे जाणाऱ्या मोटारसायकलला (एमएच २० बीएस ३९९३) समोरून जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला.

मुकेश केकडिया (२२), सुनील पुण्या वास्के (१५), भवानीसिंग छमकर लिंगवा (२२)अशी मृतांची नावे असून तिघेही मध्य प्रदेश येथील रहिवासी आहेत. तिघेही मजुरीनिमित्त इकडे आले होते. हा अपघात महामार्गावरील अवघड वळणावर घडला. रेल्वे संघर्ष समिती तसेच परिसरातील नागरिक, पदाधिकाऱ्यांनी हे वळण धोकादायक असून राष्ट्रीय प्राधिकरणाने येथे उड्डाणपूल तयार करावा, अशी मागणी केली होती. संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ.अण्णा शिंदे यांनीही हे अपघातस्थळ होऊ शकते, त्यामुळे येथे योग्य त्या उपाययोजना कराव्यात, चुकीचे फलक दुरुस्त करावेत, असे सुचवले होते.

बातम्या आणखी आहेत...