आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:सिध्देश्‍वर धरणाचे आठ दरवाजे उघडले, 7300 क्युसेक पाण्याचा विसर्ग, पूर्णा नदी काठच्या 22 गावांना सतर्कतेचा इशारा

हिंगोलीएका वर्षापूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक

हिंगोली जिल्हयातील सिध्देश्‍वर धरणाचे ८ दरवाजे उघडले असून त्यातून ७३०० क्युसेक पाण्याचा पूर्णा नदीच्या पात्रात विसर्ग केला जात आहे. त्यामुळे नदी काठच्या २२ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर येलदरी धरणातील पाण्याचा येवा लक्षात घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे पूर्णा पाटबंधारे विभागाच्या सुत्रांनी सांगितले.

हिंगोली जिल्हयातील सिध्देश्‍वर धरण येलदरी धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे येलदरी धरण भरल्यानंतर त्यातील पाणी पूर्णा नदीच्या पात्रातून सिध्देश्‍वर धरणात सोडले जाते. सध्या येलदरी धरणातून सिध्देश्‍वर धरणात पाणी सोडले जात असल्याने सिध्देश्‍वर धरणही शंभर टक्के भरले आहे. सध्या धरणामध्ये २५१.३८७ दशलक्ष घनमिटर पाणीसाठा झाला आहे. सध्या धरणात जिवंतसाठा १०० टक्के झाल्यामुळे धरणाचे १३ पैकी ८ दरवाजे उघडण्यात आले आहेत. यामध्ये दरवाजा क्रमांक २, ४, ६, ७, ८, ९, ११ व १३ या दरवाजांचा समावेश आहे. यामधून ७३०० क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

या धरणातील पाणी पूर्णा नदीच्या पात्रात सोडण्यात आले आहे. त्यामुळे नदी पात्राच्या परिसरातील २२ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर धरणामध्ये येलदरी धरणातून पाण्याचा येवा लक्षात घेऊन पाण्याचा विसर्ग वाढविणे किंवा कमी करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

२२ गावांनी सतर्क रहावे ः रुचेश जयवंशी, जिल्हाधिकारी हिंगोली

सध्या हिंगोली जिल्हयात पाऊस सुरु आहे. या पावसाच्या पाण्यासोबतच पूर्णा नदीच्या पात्रात सिध्देश्‍वर धरणातील पाणी सोडले जात आहे. त्यामुळे नदीला पुर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नदी काढच्या गावांनी सतर्क रहावे. पाणी पातळी वाढत असतांना तातडीने प्रशासनाशी संपर्क साधावा.

बातम्या आणखी आहेत...