आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआजारी भावाला नोकरी लावण्यासाठी मोठ्या भावाने नऊ लाख रुपये देऊ केले. मात्र, चार महिने बिनपगारी काम करवून घेतल्यानंतर स्थलांतराचे कारण देत रुग्णालय बंद करुन नोकरीवरुन काढले. नंतर फक्त ८० हजार परत केले. उर्वरित रक्कम परत देण्याची मागणी केल्यावर जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी अजय माणिकराव कांबळे (रा. बजाजानगर, वाळूज) व अविनाश माणिकराव कांबळे (रा. प्रतापनगर) यांच्या विरोधात सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही महिन्यांपुर्वी प्रशांत सुभाष काटे (४२) यांच्या वडिलांचे निधन झाले. आई व भाऊ आजारी असल्याने उपचारांसाठी त्यांनी घर विकले. अविनाश व अजय यांनी त्यांचा भाऊ प्रणित काटे यास नागरी विकास बहुउद्देशीय संस्थेच्या रुग्णालयात नोकरीचे आमिष दाखवले. त्यासाठी काटे यांनी अविनाशला १ लाख ११ हजार रुपये दिले. त्यानंतर सप्टेंबर, २०२१ मध्ये सचिन झवेरी यांच्या गुलमंडीतील कार्यालयात ३ लाख रुपये दिले.
त्यानंतर चार महिने प्रविण यांनी नोकरी देखील केली. मात्र, पगार मिळाला नाही. त्यांनी विचारणा करताच कन्नड येथे स्थलांतर करण्याचे कारण देऊन रुग्णालय बंद केले. पुन्हा काटे यांच्याकडून आरोपींनी साडेतीन लाख रुपये घेतले. असे एकुण ८ लाख घेऊनही नंतर टोलवाटोलवी सुरू केेली. तगादा लावल्यानंतर ८० हजार रुपये परत केले. मात्र, नंतर जिवे मारण्याची धमकी देत उर्वरित पैसे देण्यास नकार दिला. काटे यांनी झवेरी व नाईकांमार्फत विनंती केली. पण काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे काटे यांनी सिटीचौक पाेलिसात तक्रार दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.