आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साथीचा उद्रेक:शहरात गोवरची आठ संशयित बालके, आतापर्यंत सुमारे दीडशे जणांना लागण

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात दिवसेंदिवस गोवर साथीचा उद्रेक वाढत चालला आहे. ९ डिसेंबर रोजी ८ संशयित बालके आढळून आली. नेहरूनगर, भीमनगर, मसनतपूर, पुंडलिकनगर भागात जास्त उद्रेक झाला आहे. गोवरची लागण झालेल्या बालकांची संख्या दीडशेवर पाेहाेचली आहे. मनपाच्या आरोग्य विभागाने सर्वेक्षण सुरू करताच बालकांची संख्या वाढतच आहे. चिकलठाणा, नेहरूनगर, विजयनगर, बायजीपुरा, भवानीनगर या पाच भागात गोवरचा उद्रेक झाल्याचे आरोग्य विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे. गोवर बालकांवर खासगी रुग्णालयात उपचार केले जात असले तरी त्याची माहिती मनपाच्या आरोग्य विभागाला कळवली जात आहे.

यातील नवीन भागात आढळून येणाऱ्या गोवर बालकांच्या रक्ताचे नमुने मुंबई येथील हाफकिन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जात आहेत. आतापर्यंत ४४ बालकांचा अहवाल प्राप्त झाला असून १७ बालके गोवर पॉझिटिव्हचे आढळून आले आहेत. प्रयोगशाळेकडून आणखी ३६ अहवाल येणे बाकी आहे. रोज संशयित बालके निदर्शनास येत आहेत. शुक्रवारी गोवरची ८ संशयित बालके निघाली. त्यात पुंडलिकनगर २, नेहरूनगर ३, भीमनगर, मसनतपूर, छावणी या भागात प्रत्येकी एक याप्रमाणे बालके आढळून आली आहेत. तसेच ९ महिने ते ५ वर्षे वयोगटातील २१६ बालकांचे लसीकरण केले आहे.

बातम्या आणखी आहेत...