आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक सूर्य दिन विशेष:मराठवाड्यात 8 हजार ग्राहक सौर ऊर्जावंत, महिन्याला 10 लाख रुपयांची 135.6 मेगावॅट वीजनिर्मिती क्षमता

औरंगाबाद | संतोष देशमुख16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाड्यातील ८ हजार २६ ग्राहकांनी सौर पॅनल बसवून दर महिन्याला १० लाख १३ हजार ६०० रुपयांच्या १३५.६ मेगावॅट वीजनिर्मितीला सुरुवात केली आहे. यामध्ये घरगुती ग्राहक पहिल्या क्रमांकावर, व्यावसायिक दुसऱ्या, पाणीपुरवठा, शासकीय- निमशासकीय कार्यालये म्हणजेच इतर ग्राहक तिसऱ्या, तर उद्योजक चौथ्या क्रमांकावर आहेत.

राज्यात बसवले ८५ हजार ९६३ सौर कृषी पंप : सौर कृषी पंप योजना २०१९ मध्ये लागू करण्यात आली. केंद्र व महाविकास आघाडी सरकारने अर्थसंकल्पात विशेष भरीव तरतूद करून ही योजना पुढे सुरू ठेवली. महावितरणने मार्च २०२१ पर्यंत २ लाख ४० हजार ६१७ पैकी ८५ हजार ९६३ अर्जदार शेतकऱ्यांना सौर कृषी पंप योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळाला आहे. यात मराठवाड्यातील (निम्म्यावर) ४६ हजार ७०० शेतकऱ्यांचा समावेश आहे.

मराठवाड्यातील ग्राहक व सूर्यापासून मिळत असलेल्या मेगावॅट विजेच्या क्षमतेचा आलेख
ग्राहक प्रकार संख्या मे.वॅ.
घरगुती 03 0.2
व्यावसायिक 56 19.3
औद्योगिक 132 46.2
इतर 44 8.0
एकूण 235 73.7
लघु दाब संख्या मे.वॅ.
घरगुती 5750 30.1
व्यावसायिक 1267 15.5
औद्योगिक 181 6.5
इतर 593 9.8
एकूण 7791 61.9

उच्च व लघु दाब मिळून एकूण ग्राहक 8 हजार 26 व 135.6 मेगावॅट सौर विजेची निर्मितीची क्षमता आहे. 1000 किलोवॅट म्हणजे 1 मेगावॅट होय. 6000 रुपये प्रति मेगावॅट X 135.6 = 10 लाख 13 हजार 600 रुपये होतात.

१ लाख शेतकरी प्रतीक्षेत
महावितरणने १ लाख २४ हजार ६९२ अर्ज विविध कारणांनी बाद केले. एप्रिल २०२१ पासून केंद्राने महावितरणऐवजी महापारेषणची नियुक्ती केली. गतवर्षात १ लाख शेतकऱ्यांनी सौर कृषी पंप योजनेसाठी ऑनलाइन अर्ज केले. ३६५ दिवसांत केवळ २ हजार ७५० शेतकऱ्यांना योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळाला. दुसऱ्या टप्प्यात ५० हजार शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट आहे.

देखभाल-दुरुस्तीचा खर्च नाही
१ किलोवॅट सौर पॅनल बसवण्यासाठी १० चौरस मीटर जागा लागते. २५ वर्षांपर्यंत मेंटेनन्स नाही. पाच वर्षांच्या देखभाल खर्चासह सौर पॅनल बसवले जाते. १ किलोवॅटसाठी ४६ हजार ८२० रुपये एक ते दोन किलोवॅटसाठी ४२४७० दोन ते तीन किलो वॅटसाठी ४१ ३८० रुपये मिळते. केंद्र सरकार ३ किलोवॅटपर्यंत सौर ऊर्जेवर ४०% व १० किलो अथवा ३ किलो वॅटवर २०% अनुदान देते.

असा करावा अर्ज
solarrooftop.gov.in वर जाऊन सोलार रूफटॉफ कॅल्क्युलेटर देण्यात आले आहे. यात सोलार पॅनल कपॅसिटी यू वाँट टू इन्स्टाॅलवर क्लिकर करून तुमच्या किती किलोवॅट सोलर पॅनल लागणार आहे, बजेट किती ते भरून द्यावे. यानंतर तुम्ही होम पेजवर अपलाय फॉर रूफटॉफ पर्यावर क्लिक करावे css.mahadiscom.in लिंकवर क्लिक करा अर्ज भरावा.

जिल्हानिहाय ग्राहक संख्या (सर्व स्रोत : महावितरण सांख्यिकी विभाग)

बातम्या आणखी आहेत...