आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:कुंभारवाडी येथे घरात खेळण्यासाठी आलेल्या आठ वर्षीय बालिकेवर तरुणाचा अत्याचार, आखाडाबाळापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

हिंगोलीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

कळमनुरी तालुक्यातील कुंभारवाडी येथे घरात खेळण्यासाठी आलेल्या एका 8 वर्षीय बालिकेवर 18 वर्षाच्या तरुणाने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात त्या तरुणाला पोलिसांनी वारंगा फाटा शिवारातून शनिवारी ता.1 पहाटे ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कळमनुरी तालुक्यातील कुंभारवाडी येथील एक कुटुंब शेतात कामासाठी गेले होते. सायंकाळी पाच वाजता त्या कुटुंबातील आठ वर्षाची मुलगी शेजारी राहणाऱ्या रामा कामन डाखोरे (18) याच्या घरी खेळण्यासाठी गेली. त्याच्या घरी देखील कोणीही नव्हते. या संधीचा गैरफायदा घेत रामा डाखोरे यानी त्या बालिकेवर अत्याचार केला. त्यानंतर घरातून पळ काढला.

दरम्यान सायंकाळी उशिरा त्या बालिकेचे कुटुंब घरी आल्यानंतर त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी याबाबत त्या बालिकेला विचारणा केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी आखाडा बाळापुर पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. यावरून आखाडाबाळापुर पोलिसांनी रामा डाखोरे याच्याविरुद्ध शुक्रवारी ता. 31 रात्री उशिरा अत्याचाराचा गुन्हा दाखल केला.

या प्रकरणात आखाडा बाळापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर, जमादार शेख बाबर यांच्या पथकाने तातडीने आरोपीचा शोध सुरू केला. आज पहाटेच्या सुमारास तो वारंगा फाटा येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यास वारंगा फाटा येथून ताब्यात घेतले आहे. सध्या त्याची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे . सहाय्यक पोलीस निरीक्षक रवि हुंडेकर पुढील तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...