आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घृणास्पद प्रकार:पोटच्या मुलीवर जबरदस्ती करणाऱ्या नराधम बापाला अठरा महिने सक्तमजुरी

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोटच्या मुलीला मोबाइलमध्ये अश्लील व्हिडिओ दाखवून तिच्यावर जबरदस्ती करीत शरीरसुखाची मागणी करणाऱ्या ४७ वर्षीय नराधम बापाला १८ महिने सक्तमजुरी आणि ५०० रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश के. आर. चौधरी यांनी ठोठावली. या प्रकरणात २० वर्षीय पीडितेने फिर्याद दिली होती. उच्चशिक्षित असलेल्या या पीडितेसोबत पाच वर्षांपूर्वी हा घृणास्पद प्रकार घडला. त्या वेळी ती १६ वर्षांची होती.

दहाव्या इयत्तेत शिकणाऱ्या पीडितेने वडिलांच्या या धक्कादायक प्रकाराबद्दल आईला वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला होता, मात्र आईने त्यावर विश्वास ठेवला नव्हता. हद्द म्हणजे पुढे नराधमाने मुलीकडे थेट शरीरसुखाची मागणी केली. तरीही तिने व आईने नराधमास समजावण्याचा प्रयत्न केला. काही दिवस शांत राहून नराधमाने पुन्हा ते अश्लील चाळे सुरू केले होते. अखेरीस पीडितेने ३ मे २०२१ ला नराधम बापाविरोधात महिला तक्रार निवारण केंद्रात तक्रार केली. एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात तत्कालीन उपनिरीक्षक निरीक्षक प्रीती फड यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीवेळी सहायक लोकाभियोक्ता सुदेश शिरसाठ यांनी साक्षीदारांचे जबाब नोंदवले. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपीला भादंवि कलम ३५४ (अ) अन्वये १८ महिने आरोपीस सक्तमजुरी आणि ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून जमादार शेख रज्जाक यांनी काम पाहिले.

बातम्या आणखी आहेत...