आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:आईवर कविता लिहणाऱ्या आठवीतील मुलाने गळफास घेऊन केली आत्महत्या; औरंगाबादेतील घटना

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

आठवीच्या विद्यार्थ्याने राहत्या घरी ओढणीच्या साहाय्याने फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना १० मार्च रोजी रेणुकानगर, गारखेडा परिसरात उघडकीस आली. सुजित जालिंदर साळवे (१४) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. सुजित शिवाजीनगरातील कलावती चव्हाण महाविद्यालयात शिक्षण घेत होता. त्याची आई खासगी रुग्णालयात परिचारिका आहे, तर वडील रिक्षाचालक आहेत. गुरुवारी आई-वडील नेहमीप्रमाणे कामावर गेले होते. सुजित व त्याचा १० वर्षांचा लहान भाऊ घरी होते. संध्याकाळी भाऊ घराबाहेर खेळत होता. त्यामुळे सुजित घरात एकटाच होता. त्यानंतर अर्ध्या तासाने लहान भाऊ घरात गेला असता, त्याला सुजितने गळफास घेतल्याचे दिसले. त्यामुळे त्याने आरडाओरड सुरू केल्यानंतर शेजारी धावून आले. शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती देत सुजितला खाली उतरवून घाटीत दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी पुंडलिकनगर ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
मोबाइल उघडल्यावर कारण कळू शकेल..: सुजित वापरत असलेल्या मोबाइलला पासवर्ड होता. पोलिसांनी त्याच्या मोबाइलचा पासवर्ड ब्रेक करण्यासाठी मोबाइल दिला असून, तो उघडला की त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकेल, असे पोलिसांनी सांगितले.

सुजितला कविता लिहिण्याचा छंद
सुजितची आई कोरोनाकाळातही कामावर जात होती. त्यामुळे त्याने आईवर कविता लिहिल्या होत्या. पोलिसांना घरात एक डायरी सापडली होती. ती उघडून पाहिली असता, त्यात आईवर कविता लिहिलेल्या आढळून आल्या.

बातम्या आणखी आहेत...