आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआजपासून औरंगाबादच्या सिल्लोडमध्ये कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन केले आहे. 40 एकरावर हा कृषी महोत्सव भरवला गेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या कृषी महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
या महोत्सवात कला, क्रीडा आणि संस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आलेय. पण हा कृषी महोत्सव सुरुवातीपासूनच वादात अडकलेला आहे. कृषी महोत्सवासाठी कृषी अधिकाऱ्यांना गोल्ड, सिल्वर पासेस विक्री करण्याचा आणि पैसा गोळा करण्याचा टार्गेट दिल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.
कृषीमंत्र्यांचे धन्यवाद
उद्धाटनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, लाखो शेतकरी याठिकाणी उपस्थित आहेत. पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड मिळायला हवी. पौष्टीक तृणधान्याच्या लागवडीची सुरुवात सिल्लोडमधून होत आहे. त्यासाठी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचे या कृषी महोत्सवासाठी धन्यवाद व्यक्त करतो.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी व्हाव्या
पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे याची माहिती प्रदर्शनात मिळेल. शेतकरी मोठा उद्योजक होऊ शकतो याची देखील माहिती या कृषी प्रदर्शनातून मिळेल. यातून शेतकऱ्यांना लाभ होईल. नक्कीच त्यांच्या आयुष्यात बदल होईल. शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी व्हाव्यात यासाठी आमचं सरकार काम करत असल्याचे ते म्हणाले. खूप मोठी सभा याठिकाणी होणार होती. मात्र इगतपुरीच्या घटनेमुळे ही सभा रद्द करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
फळ पिकांचे तंत्रज्ञान
या कृषी महोत्सवा विविध पिकाचे, फळ पिकांची तंत्रज्ञानाची माहिती मिळणार आहे. राज्यातील चारही कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाची माहिती मिळणार आहे. तसेच विविध कंपनीचे स्टॉल्स लागणार आहेत. यावेळी राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, खासदार इम्तियाज जलील, मंत्री संदीपान भुमरे यांची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.