आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्रपती संभाजीनगरच्या किराडपुऱ्यातील राम मंदिर पोलिसांनी वाचवले. खासदार इम्तियाज जलील हे मंदिराच्या नव्हे, तर स्वत:च्या बचावासाठी मंदिरात गेले होते, असा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी केला आहे. तर मी त्यांना फोन करून याबाबत जाब ही विचारल्याचेही ते म्हणाले.
राजेंद्र जंजाळ पुढे बोलताना म्हणाले की, आम्हाला पोलिसांच्या कामावर शंका नाही, पण खासदार जलील हे मात्र हिंदूवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आहेत. हा जमाव जलील यांना दगडे मारायला पुढे आल्याने जलील मंदिरात आले. त्यांना पोलिसांनी वाचवले. तिथे त्यांच्याच दोन गटात वाद झालेला असताना हिंदूवर गुन्हा का दाखल करायचा, तिथे हिंदू नव्हतेच तर, गुन्हे कुणावर दाखल करणार? असा सवाल राजेंद्र जंजाळ यांनी उपस्थित केला आहे.
राजेंद्र जंजाळ म्हणाले की, मी खासदार जलील यांना मंदिरात काय करताय असा सवाल केला. यावर बोलताना ते म्हणाले, मंदिराला धक्का नाही. मी इथेच आहे. मात्र, बाहेर दंगल सुरू आहे. शहागंजमध्ये अतिक्रमण काढले तेव्हा दंगल भडकली. किराडपुऱ्यातील अतिक्रमक काढण्यात येत असतानाच दंगल भडकली, यामागे नेमके कोण असा सवालही राजेंद्र जंजाळ यांनी उपस्थित केला आहे.
राजेंद्र जंजाळ म्हणाले की, जिवाची बाजी लावत दंगल थोपवणाऱ्या पोलिस उपायुक्त अपर्णा गिते, आणि पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांचे अभिनंदन करतो. या दंगलीमध्ये गिते जखमी झाल्या. महिला पोलिस अधिकाऱ्यांवर हात उचलणाऱ्या प्रवत्तीचा आम्ही निषेध करतो. यापूर्वी राजाबाजारमध्ये देखील पोलिसांना टार्गेट करण्यात आले. दंगेखोरांनी पोलिस गाडी सुरू करुन एक्सीलेटरवर दगड ठेवला. डिझेलच्या टाकीचे झाकण उघडून गाडी पेटवून दिल्याचेही जंजाळ यांनी म्हटले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.