आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुकानदाराचा मृत्यू:हडकोत अतिक्रमण काढताना वृद्ध जखमी, रुग्णालयात नेईपर्यंत मृत्यू

छत्रपती संभाजीनगर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनपाकडून टीव्ही सेंटर भागातील अतिक्रमण हटवताना जखमी झालेल्या बाबुलाल सांडूजी पुसे (६०) या दुकानदाराचा मृत्यू झाला. पुसे यांचे प्यासा वाइन शॉपजवळ सायकलचे दुकान आहे. सोमवारी सायंकाळी तेथे अतिक्रमण हटवण्यात येत हाेते. एक जण त्याची टपरी बाजूला घेत असताना पुसे मदतीला गेले. मात्र, टपरीचे जड पत्रे उचलताना त्यांच्या अंगावर पडले. त्यात ते बेशुद्ध झाले. त्यांना एमजीएममध्ये दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

बातम्या आणखी आहेत...