आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:वृध्द महिलेच्या खूनाचा अवघ्या चोविस तासात छडा, स्थानिक गुन्हे शाखा व सेनगाव पोलिसांची कामगिरी

हिंगोली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेनगाव तालुक्यातील साखरा येथील वृध्द महिलेच्या खूनाचा अवघ्या चोविस तासात छडा लावण्यास स्थानिक गुन्हे शाखा व सेनगाव पोलिसांना यश आले असूुन पोलिसांनी साखरा येथील एका व्यक्तीस रविवारी ता. ११ अटक केली आहे. दिलीप अंबादास लाटे (३०) असे आरोपीचे नांव असल्याचे पोलिसांनी सांगितले. दागिने व पैशाच्या वादातून त्याने खून केल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट होत आहे.

सेनगाव तालुक्यातील साखरा येथील भारजाबाई मारोती इंगळे (८५) या वृध्द महिलेचा मृतदेह साखरातांडा ते साखरा मार्गावरील घाटात खड्ड्यात पुरलेल्या स्थितीत शनिवारी ता. १० सकाळी आठ वाजता आढळून आला होता. याप्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुध्द खूनाचा गुन्हा दाखल झाला होता. घटनास्थळावर कुठलाही पुरावा नसल्यामुळे तसेच श्‍वान पथकाला आरोपीचा माग काढता आला नसल्याने या गुन्ह्याचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले होते.

दरम्यान, पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गु्ुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय, उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, किशोर पोटे, जमादार बालाजी बोके, संभाजी लकुळे, सुनील अंभोरे, विठ्ठल कोळेकर, आशिष उंबरकर व कर्मचाऱ्यांचे पथक तसेच सेनगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक कृष्णदेव पाटील, उपनिरीक्षक अभय माकणे, दिलीप नाईक, राहुल कोरडे यांचे पथक स्थापन करून आरोपीचा शोध घेण्यास रवाना करण्यात आले.

दरम्यान,पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता गावातील दिलीप अंबादास लाटे याने त्या महिलेचा खून केल्याची प्राथमिक माहिती आज सकाळी सहा वाजता पोलिसांना मिळाली अन पोलिसांनी सर्व बाजू पडताळून पाहात आठ वाजता त्याला अटक केले. त्याच्या अधिक चौकशीमध्ये त्याने मयत भारजाबाई यांना शुक्रवारी ता. ९ दुपारी दवाखान्यात नेऊन आणतो असे म्हणून दुचाकीवर बसविले त्यानंतर त्यांना गावाबाहेरच फिरविले. रात्री त्यांच्या अंगावरील काही दागिने व त्यांचे पैसे घेऊन त्यांचा खून केला व शनिवारी ता. १० पहाटे त्यांचा मृतदेह पुरून पळ काढल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे.

पोलिसांनाही दिली उडवा उडवीची उत्तरे

स्थानिक गुन्हे शाखा व सेनगाव पोलिसांनी त्यास सकाळी ताब्यात घेतल्यानंतर त्याने उडवा उडवीची उत्तरे देण्यास सुरवात केली. त्याने त्याच्या सोबत इतर चार ते पाच जण असल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता राजकिय वादातून त्याने हि नावे घेतल्याचे स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...