आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदार ओळखपत्र आजपासून आधारला लिंक करता येणार:औरंगाबाद जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची माहिती

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत निवडणूक आयोगाच्या शिफारसीनुसार लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950 यातील कलम 13 मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. या सुधारने नुसार मतदाराकडून मतदार यादीत त्यांचा आधार क्रमांक संलग्न करून प्रमाणीकरण करण्याच्या नियमाची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानुसार 1 ऑगस्टपासून जिल्ह्यातील सर्व नऊ विधानसभा मतदारसंघात हे आधार संलगणीकरण करण्यात येणार आहे.

या अनुषंगाने औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व बीएलओ मतदारांच्या घरी जाऊन आधार कार्ड जोडण्याची प्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी जिल्हापरिषदेचे मुख कार्यकारी अधिकारी निलेश गटणे अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा राणी भोसले निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी भारत कदम यांची उपस्थिती होती

सहा नंबर फॉर्म भरून घेतला जाणार

यामध्ये मतदारांकडून सहा ब चा फॉर्म भरून घेतला जाणार आहे .औरंगाबाद जिल्ह्यात 29 लाख मतदार आहेत तर 2800 बी एल ओ या मतदारांच्या घरी जाऊन हे फॉर्म भरून घेण्यात येईल. तसेच मतदाराला भारत निवडणूक आयोगाने विकसित केलेल्या वोटर हेल्पलाइन ॲपच्या माध्यमातून देखील आधार क्रमांक मतदार यादी मध्ये प्रमाणीकरण करता येईल.मतदाराने त्याच्या मोबाईलवर गुगल प्ले स्टोअर मधून ॲप डाऊनलोड करून त्यावर नोंदणी करता येईल. त्यासाठी मतदारांनी त्यांचा मतदार ओळखपत्र क्रमांक टाकावा त्यानंतर त्याच्या मतदार यादीतील सर्व माहिती दिसेल त्यानंतर त्याचा आधार क्रमांक नोंदवून त्यास ओटीपी प्राप्त होईल तो सबमिट केल्यानंतर त्याचे आधार प्रमाणीकरण यशस्वी होईल. जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघात आजपासून ही मोहीम सुरू करण्यात आली असून एक एप्रिल 2023 पर्यंत ही मोहीम चालणार आहे .

मतदाराकडे जर आधार क्रमांक नसेल व त्यामुळे ते आधार क्रमांक सादर करता येत नसेल तर मतदार नमुना सहा ब भरून त्यासोबत अकरा पैकी कुठलाही एक पुरावा साक्षाकित करून सादर करू शकतात. यामध्ये मनरेगा जॉब कार्ड, बँक किंवा पोस्टाचे छायाचित्र असलेले पासबुक, ड्रायव्हिंग लायसन, पॅन कार्ड ,पासपोर्ट ,छायाचित्र असलेलेपेन्शन दस्तावेज, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना किंवा केंद्राच्या कर्मचाऱ्यांना छायाचित्र असलेले सेवा ओळखपत्र आधार कार्ड हे पुरावे म्हणून दिले जाऊ शकतात

चार वेळा नोंदवता येणार नाव

भारत निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार मतदार यादी मध्ये नाव नोंदवण्यासाठी केवळ एक जानेवारी हीच तारीख होती.मात्र आता वर्षातून चार दिवस देण्यात आले आहेत. 1 जानेवारी 1 एप्रिल एक जुलै आणि एक ऑक्टोबर अशा चार दिवशी मतदार योजनेचे नाव नोंदवता येणार आहे

बातम्या आणखी आहेत...