आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागद्दारी करून जे सरकार स्थापन झाले आहे त्याच्या पायाखालची जमीन सरकली आहे. कुठल्याच सर्व्हेमध्ये निवडून येतील असे समोर येत नाही. त्यामुळे बाजार समिती, ग्रामपंचायती अशाच निवडणुका घेतल्या जात आहेत. हिंमत असेल तर या सरकारने चिन्हावर आधारित असलेल्या निवडणुका लावाव्यात. आमचे धनुष्यबाणाचे चिन्ह चोरून नेले, मात्र आमची ओळख फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे, असे मत मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केले. १ मार्च रोजी तापडिया नाट्यमंदिरात आयोजित शिवगर्जना मोहिमेत त्या बोलत होत्या.
गद्दारांनी मधमाशाच्या मोहोळाला दगड मारला आहे. मधमाशारूपी शिवसैनिकांचे हे वादळ उठले आहे. आता गद्दारांना गाडल्याशिवाय शांत होणार नाही, असेही पेडणेकर म्हणाल्या. या वेळी माजी आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा, जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, राजेंद्र राठोड, माजी महापौर नंदकुमार घोडेले यांची उपस्थिती होती.
मोदी सरकार हाय हाय, गॅस भाववाढ रद्द करण्याची केली मागणी केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरचे दर ५० रुपयांनी आणि व्यावसायिक सिलिंडरचे दर ३५० रुपयांनी वाढवल्याच्या विरोधात मेळावा सपंल्यानंतर निदर्शने करीत निषेध व्यक्त केला. ‘मोदी सरकार हाय हाय’, ‘मोदी सरकारचे करायचे काय खाली मुंडके वर पाय’, ‘सिलिंडरची भाववाढ रद्द करा, नसता खुर्च्या खाली करा’ घोषणांनी परिसर दणाणून सोडला. महिलांनी मोदींच्या नावाने बांगड्यांचा आवाज केला.
आता हेवेदावे विसरून काम करा महाशक्तीने जो शिवसेनेवर आघात केला ते पाहून शिवसैनिकांसह सर्वसामान्य माणसांची मने पेटून उठली आहेत. आपण सर्वजण निवडणुकांची वाट पाहत आहोत. परंतु, मिंधे सरकार आणि महाशक्ती निवडणुका घ्यायला तयार नाही. हा काळ कसोटी आणि संघर्षाचा आहे. हे शेवटचे संकट गाडावेच लागेल. त्यानंतर मात्र शिवसेनेला चंद्र-सूर्य असेपर्यंत भीती राहणार नाही, असे मत माजी आमदार अनिल कदम यांनी व्यक्त केले. युवा सैनिकदेखील भक्कमपणे काम करत आहेत, असा विश्वास अंकित प्रभू यांनी व्यक्त केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.