आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

70 ई बसचा प्रस्ताव वरिष्ठांकडे:इलेक्ट्रिक बस चार्जिंग सेंटरचे काम सुरु; 2 तासांत 4 ई- बसची बॅटरी होईल चार्ज

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात पुण्यात सर्वप्रथमच 1 जूनपासून ई - बस धावण्यास सुरुवात झाली आहे. टप्प्याटप्प्याने संपूर्ण आगारातून ई - बस धावणार आहेत. औरंगाबाद विभागातील आठ आगारासाठी 70 ई बस मागणीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. तर, बॅटरी चार्जिंग सेंटरचे काम सुरु झाले आहे. दोन तासांत एकाच वेळी चार बॅटरी चार्जिंग होतील.

वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पेट्रोल व डिझेलची मागणी वाढली आहे. परिणामी इंधनाचे दर भरमसाठ वाढले आहेत. प्रदुषणाचा प्रचंड ऱ्हास होत आहे. यावर मात करण्यासाठी पर्याय म्हणून केंद्र सरकारने पर्यावरण पुकर ई कार, ऑटोरिक्षा, दुचाकी आणि बस चालवण्यासाठी धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार ई वाहन मोठ्या प्रमाणात बाजारात विक्रीसाठी दाखल होत आहेत.

पुणे आगारात ई बस धावायला सुरुवात झाली आहे. तर सर्व आगारात लवकरच ई बस दाखल होणार आहेत. औरंगाबादेतील आठ आगारात सत्तर बसची मागणी करण्यात आली आहे. मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील विभाग नियंत्रक कार्यालयाच्या पाठीमागील जागेत चार्जिंग सेंटर उभारण्याचे काम वेगाने पूर्ण केले जात आहे. एकाच वेळी चार ई बसची बॅटरी दोन तासांत चार्जिंग होईल. अशी माहिती विभाग नियंत्रक यांनी दिव्य मराठीशी बोलताना दिली.

ई चार्जिंग सेंटर

जसे पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंप असतात तसेच ई बस व इतर ई वाहनांची बॅटरी चार्जिंग करण्यासाठी विद्युत चार्जिंग सेंटर महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे शहरात 42 जणांनी ई चार्जिंग सेंटरसाठी महावितरणकडे प्रस्ताव दाखल केला आहे.

ई बस व वाहनांचे फायदे

ध्वनी, वायू प्रदुषण होत नाही. विद्युतवर वाहन चालणार असल्याने पेट्रोल व डिझेलवरील भार कमी होईल. इंधन खर्चातही बचत होणार असल्याने ई वाहन धोरण अतिशय उपयुक्त ठरणार आहे.

बातम्या आणखी आहेत...