आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासगीकरणाला विरोध:विद्युत मंडळाचे अधिकारी आंदोलनाच्या पवित्र्यात

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अदानी उद्योग समूहामुळे राज्यात महावितरणच्या सर्व कंपन्यांमध्ये खासगीकरणाचे वारे वाहू लागले आहे. त्यास महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ अधिकारी आंदोलनातून तीव्र विरोध करण्याची तयारी करत आहेत. संघटनेचे सरचिटणीस संजय खाडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, विद्युत क्षेत्र पूर्णपणे राज्याच्या विकासाशी संबंधित असल्याने ते सरकारी अखत्यारीत असणेच अत्यावश्यक आहे. केवळ नफेखोरीसाठी ग्राहक, शेतकरी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या हिताला बाधा आणणे घातक ठरू शकते. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या खासगीकरण धोरणाविरुद्ध पुढील काळात अधिकारी वर्गही मोठे आंदोलन करण्याच्या तयारीत आहे.

बातम्या आणखी आहेत...