आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवाशांची गैरसोय:रेल्वेस्थानकावरील लिफ्ट बंद, मालधक्काहलवला नाही; प्रवासी निवासगृहाला टाळे

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरातील रेल्वेस्थानकाची दुरवस्था झालेली आहे. लिफ्ट बंद असून, सरकत्या जिन्यावर मुले खेळत आहेत. मालधक्का शहराबाहेर हलविला नाही. स्थानकावरील स्कायवॉकच्या फरशा निघाल्या असून स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. कोविडनंतर बंद पडलेले प्रवासी निवास गृह बंद असून त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून रेल्वेचा महसूल बुडत आहे.

दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक शुक्रवारी (९ डिसेंबर) पाहणी करण्यासाठी येत आहेत. रेल्वेचे महाव्यवस्थापक दौऱ्यावर येण्यापूर्वी सर्व सुविधा चकाचक करण्याचे काम प्रशासन करते. ‘दिव्य मराठी’चे छायाचित्रकार आणि प्रतिनिधीने एक दिवसापूर्वी आढावा घेतला असता रेल्वेस्थानक समस्यांचे माहेरघर बनल्याचे स्पष्ट झाले. मालधक्क्यावरून बाहेर जाणाऱ्या स्कायवॉकच्या फरशा निघालेल्या आहेत. स्वच्छतागृहाच्या फरशा निघाल्या असून स्वच्छता नियमित होत नसल्याचे जाणवते. मालधक्का शहराबाहेर हलवून तेथे २४ डब्यांची पिटलाईन करण्याची सूचना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली होती.

परंतु अद्याप मालधक्का शहराबाहेर हलवण्यात आला नाही. स्थानकावरील सरकता जिना बंद असून, लिफ्टही बंद आहे.लहान मुलांच्या स्तनपानासाठी ठेवलेल्या हॉलमध्ये मद्यपी येऊन झोपतात. स्थानकावरील प्रवाशांच्या निवासासाठी वातानुकूलित व साधा असा प्रत्येकी एक हॉल बंद असून प्रवाशांना खाेल्याही देणे बंद करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...