आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:विद्यार्थ्यांची ऑनलाइन प्रवेशाच्या कटकटीतून सुटका, यंदा अकरावीचे प्रवेश होणार ऑफलाइन ऑनलाइन प्रक्रिया रद्द

औरंगाबादएका वर्षापूर्वीलेखक: विद्या गावंडे
  • कॉपी लिंक

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया औरंगाबादमध्ये रद्द करण्यात यावी. अशी सुरुवातीपासून संस्थाचालक आणि विद्यार्थ्यांची मागणी होती. मनपसंत महाविद्यालयात इच्छा असूनही नंबर न लागल्याने प्रवेश घेता येत नसल्याने विद्यार्थ्यांचा हिरमोड होत होता. परिणामी ऑनलाइनची कटकट नको म्हणून शहरा ऐवजी ग्रामीण भागात अकरावीच्या प्रवेशासाठी गर्दी होत होती. मात्र या ऑनलाइनच्या कटकटीतून विद्यार्थ्यांची आता सुटका होणार आहे. याचे कारण म्हणजे २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठीचे औरंगाबाद शहरातील अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. तसेच पत्रच शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे सहसचिव राजेंद्र पवार यांनी शिक्षण उपसंचालकांना पाठवले आहे.

दरम्यान संस्थाचालकांसह पदवीधर आमदार सतीश चव्हाण यांनी देखील औरंगाबाद शहरातील ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया रद्द करण्यात यावी. या मागणीसाठी जोर धरला होता. यामुळे येणाऱ्या अडचणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या समोर मांडल्या होत्या. विद्यार्थी पालकांची अडचण लक्षात घेता हा निर्णय रद्द करत आता ऑफलाइन प्रवेश होतील असे चव्हाण म्हणाले.

औरंगाबाद शहरात २०१७-१८ पासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत होती. सुरुवाती पासूनच या प्रवेश प्रक्रियेला विरोध होत आला होता. विद्यार्थ्यांना शहरातील महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही तर महाविद्यालयांना देखील विद्यार्थी मिळत नव्हते. शिवाय ग्रामीण भागाला ऑनलाइन प्रक्रियेतून वगळल्याने शहरातील विद्यार्थी खासगी शिकवणी करता यावी. महाविद्यालयात जाण्याची गरज नाही. ऑनलाइन अर्ज भरण्याची कटकट नको म्हणून ग्रामीण भागातील महाविद्यालयांना प्रवेश घेत होते. मागील चार वर्षांतील औरंगाबाद शहरातील कनिष्ठ महाविद्यालयात सन २०१७-१८ मध्ये ५० टक्के, १८-१९ मध्ये ५१ टक्के, तर १९ -२० मध्ये ६० टक्के आणि 20-21 मध्ये ४५ टक्के विद्यार्थ्यांच्या जागा रिक्त राहिल्या आहेत. तसेच आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑफलाइन प्रवेश होणार असल्याने विद्यार्थी-पालकांना दिलासा मिळाला आहे. सहसचिव पवार यांनी दिलेल्या पत्रानुसार सन २०२१ -२२ या शैक्षणिक वर्षासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरण क्षेत्र पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, अमरावती, नाशिक या ठिकाणी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात यावी असे म्हटले आहे. या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतून औरंगाबादला वगळण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...