आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षण:अकरावीचे नो टेन्शन : जिल्ह्यातील 61 हजार पास विद्यार्थ्यांसाठी 72 हजार जागा ; पुरेशा जागा उपलब्ध

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहावीच्या परीक्षेत औरंगाबाद जिल्ह्यातून ६१ हजार ४४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. साहजिकच यापैकी बहुतांश विद्यार्थ्यांचा अकरावी प्रवेशाकडे कल आहे. यंदा अकरावीचे प्रवेश ऑनलाइन न होता ऑफलाइन पद्धतीने होणार आहेत. विद्यार्थिसंख्या मोठी असली तरी काही विद्यार्थी हे शॉर्ट टर्म कोर्स, पॉलिटेक्निक, आयटीआय, पॅरामेडिकल कोर्सेसनाही प्रवेश घेतात. अकरावी प्रवेशासाठी शहर व जिल्ह्यात ७२,८६० एवढ्या पुरेशा जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना कुठलीही अडचण येणार नाही, अशी माहिती शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी दिली.

अनुदानित महाविद्यालये १२,८६० कला २,८०० वाणिज्य

१६,४८० कला ४,६८० वाणिज्य

क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश नकोत

{ पुरेशा जागा उपलब्ध असल्या तरी काही महाविद्यालयांतच प्रवेशासाठी जास्त गर्दी होते. मात्र कुणीही मर्यादेपेक्षा अधिक प्रवेश देऊ नयेत यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी ४ पथकांद्वारे प्रवेशाची पडताळणी करणार आहेत. { सक्षम प्राधिकाऱ्यांची मान्यता घेतल्याशिवाय कॉलेजने मंजूर प्रवेश क्षमतेपेक्षा जादा प्रवेश देऊ नयेत, अन्यथा ते अनधिकृत ठरवून विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार नाही.

बातम्या आणखी आहेत...