आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक:अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक जाहिर, शाळा-महाविद्यालयांच्या ऑनलाइन नोंदणी आणि अपडेट प्रक्रियेला सुरुवात

औरंगाबाद2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशभरात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लॉकडाऊन करण्यात आले आहे. तर १५ जून पासून टप्प्या टप्प्याने शाळा सुरु करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला. मात्र आता पुन्हा ३१ जुलै पर्यंत राज्यसरकारने शिथिलतेचे नियम कायम ठेवत लॉकडाऊन केले आहे. यामुळे दहावी-बारावीचा निकाल देखील लांबणीवर पडला आहे. असे असले तरी १५ जुलै अथवा त्यानंतर निकाल लागण्याची शक्यता खुद्द शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले होते. उत्तरपत्रिका संकलनाचे काम देखील पूर्ण झाले आहे. तेंव्हा बुधवारी शिक्षण विभागाने ऑनलाइन अकरावी प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक जाहिर केले असून, कनिष्ठ महाविद्यसालयांनी त्यांची माहिती तसेच नवीन मान्यता मिळालेल्या महाविद्यालयांनी त्यांची माहिती अपडेट करावी. यासाठी बुधवारी सकाळी ११ पासून सुरुवात करण्यात आली.

सध्या करेाना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्वच क्षेत्रांवर परिणाम झालेला दिसून येत असून, शैक्षणिक सत्र देखील लांबणीवर पडले आहे. दहावीचा भूगोल विषयाचा पेपर रद्द करत सरासरी गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला. जून महिन्या अखेरीस निकाल लागेल अशी शक्यता होती. परंतु लॉकडाऊनमुळे उत्तरपत्रिका तपासणी आणि संकलनाचे काम रखडले होते. अनलॉकडाऊन करत नियम शिथिल झाल्याने उत्तरपत्रिका संकलनाचे काम आता पूर्ण झाले आहे. ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया असल्याने कार्यालयीन कामांना देखील सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षण उपसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यानांनी संभाव्य वेळापत्रक जाहिर केल्याचे सांगितले.

असे आहे संभाव्य वेळापत्रक 

  • 1  ते 15 जुलैपर्यंत उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांची संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करावी.
  • 2 ते 16 जुलै दरम्यान शाळा, महाविद्यालयांनी ऑनलाइन अद्यावत केलेली माहिती तपासून अंतिम माहिती शिक्षण उपसंचालक विभागास कळवावी.
  • 15 जुलैपासून दहावीचा निकाल जाहिर होईलपर्यंत प्रवेशा अर्जाचा भाग एक विद्यार्थ्यांनी स्वत: तसेच पालकांच्या मदतीने भरावा. अर्ज अप्रुव्ह करण्यासाठी शाळा, मार्गदर्शन केंद्र  निवडूण खात्री करावी.
  • 16 जुलै पासून अर्जाचा भरलेला भाग पहिला हा ऑनलाइन तपासून अप्रुव्ह करणे आवश्यक असून, काही अडचणी असल्यास शिक्षण विभागात संपर्क करावा. 
  • प्रवेश अर्जाचा भाग दुसरा हा विद्यार्थ्यांना निकाल जाहिर झाल्यापासून भरता येईल. यापुढील माहितीचे वेळापत्रक लवकरच शिक्षण विभागामार्फत सांगण्यात येईल असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...