आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

भाजपचे आंदोलन:दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी भाजपा महायुतीचा एल्गार, 1 ऑगस्टला तीव्र आंदोलन

बीड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

 राज्यातील दूध उत्पादक शेतकरी संकटात आला असून गाईच्या दुधाला प्रति लिटर दहा रुपये अनुदान दूध भुकटी करिता प्रतिकिलो 50 रुपये अनुदान शासनाकडून 30 रुपये प्रति लिटर दुधाची खरेदी करण्यात यावी या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी व महा तिच्या सर्व घटक पक्षांच्या वतीने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या साठी 1 ऑगस्ट रोजी तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे.

या आंदोलनाचा इशारा देणारे निवेदन सोमवारी बीड येथील  निवासी उपजिल्हाधिकारी  यांना  देण्यात आले.यावेळी माजी मंत्री महादेवराव जानकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के ,प्रदेश भाजपा कार्यकारिणी सदस्य रमेश पोकळे, शेळी मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले ,जिल्हा परिषद सदस्य अशोक लोढा व नवनाथ शिराळे, भगीरथ बियाणी, स्वप्निल गलधर, सहभागी झाले होते.