आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भावनेशी सूर जुळता:भावनिक बुद्धिमत्तेची सांगीतिक उकल; 20 मे रोजी पर्वणी, भारतातला एकमेव कार्यक्रम संभाजीनगरमध्ये

छत्रपती संभाजीनगर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
किशन वतनी, भावनिक बुद्धिमत्ता तज्ज्ञ - Divya Marathi
किशन वतनी, भावनिक बुद्धिमत्ता तज्ज्ञ

भावनिक बुद्धिमत्तेच्या साक्षरतेवरील शास्त्रीय माहिती विविध भावगीतांच्या माध्यमातून उकल करणारा एक अनोखा आणि देशातील एकमेव कार्यक्रम शनिवारी (20 मे) छत्रपती संभाजीनगरमध्ये होत आहे. तापडिया नाट्यगृहात सायंकाळी सव्वासात वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात भावनिक बुद्धिमत्तेचे नेमके महत्त्व काय, याचा उलगडा भावनिक बुद्धिमत्ता तज्ज्ञ किशन वतनी करणार आहेत. 'इक्यू अकादमी'ने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

किशन वतनी यांचे सध्या दिव्य मराठी डिजिटलवर भावनिक बुद्धिमत्तेबाबत जीवन मंत्र हे सदर सुरू आहे. ते दर बुधवारी प्रसिद्ध होते. याला वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळतो.

नेमके महत्त्व काय?

आपल्या यशात आपल्या IQ पेक्षा EQ चे महत्त्व खूप जास्त असते, परंतु आपल्याला याची फारशी माहिती नसते. यशामधील जवळपास 80-85% स्किल्सचे मूळ हे आपल्या भावनिक बुद्धिमत्तेत दडलेले असते. आपल्या भावनेचे महत्त्व आधुनिक न्यरोसायन्समुळे अधोरेखित झाले आहे. आपण प्रक्टिकल होण्याच्या नादात आपल्या भावनेकडे त्रास देणारी म्हणूनच पाहात आलो आहोत. हे पाहता भावनिक बुद्धिमत्तेचे नेमके महत्त्व या कार्यक्रमातून सांगितले जाणार आहे.

स्ट्रेस मॅनेजमेंट टिप्स...

आपल्या भावना ह्या आपल्याला आलेला एकप्रकारचा मेसेज असतो, उर्जेचा स्त्रोत असतो. ह्या शिवाय तिचे अनेक महत्त्वाचे गुणधर्म असतात. नेमके भावना म्हणजे काय?, त्यांना कसे ओळखायचे?, किती प्रकारच्या भावना असतात?, त्यांचे महत्त्व काय, त्यांचा उपयोग कसा करून घ्यायचा? इमोशन कंट्रोल अंगर मॅनेजमेंट आणि एका अर्थाने स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये त्यांचा कसा वापर करायचा याच्या टिप्स सुद्धा तुम्हाला या कार्यक्रमामधून मिळतील. शिवाय भावनेचे महत्त्व सांगताना त्याची शास्त्रीय माहिती देत त्या त्या भावनेच्या विविध गाण्यांची जोड दिली जाणार आहे. ज्यामुळे ती भावना आपल्याला सहज समजेल.

गाण्यांमधून भाव...

कार्यक्रम शास्त्रोक्त माहितीपूर्ण, पण रंजक करण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. आत्तापर्यंत गाण्यांमधून विविध भाव दाखवणारे कार्यक्रम होत असतात, परंतु ते भावनिक बुद्धिमत्तेच्या अंगानी उकल करण्याचा प्रयत्न भारतात पहिल्यांदाच होत आहे. हा कार्यक्रम फक्त एंटरटेनमेंट न राहता आपल्याला त्यातून काही भरीव शिकायला सुद्धा मिळेल. ह्या कार्यक्रमाची निर्मिती 'इक्यू अकादमी'चे भावनिक बुद्धिमत्ता तज्ज्ञ किशन वतनी ह्यांनी केली आहे, तर गायनाची बाजू सुप्रसिद्ध गायिका कविता वतनी ह्यांनी सांभाळली आहे.

संबंधित वृत्तः

1) करिअरमध्ये यश मिळवून देणारी भावनिक बुद्धिमत्ता असते काय, तिचा वापर कसा करावा?

2) करिअर ते शिक्षण निर्णय कसा घ्यावा? भावनेला प्राधान्य द्यावे की, प्रॅक्टिकली विचार करावा?

3) करिअर का थांबत, ब्रेकअप कसं होतं; संवाद चुकतो कुठे, तो कसा असावा, जाणून घेऊयात!

4) एखाद्या व्यक्तीबद्दलच्या अढीमुळे आयुष्य होते उद्धवस्त; हे मानसिक वादळ कसे शांत करावे? जाणून घेऊ!

5) नैराश्य का येते, त्याची लक्षणे कोणती, त्यातून बाहेर कसे पडावे, जाणून घेऊ तज्ज्ञांकडून

6) यशाचा टर्निंग पॉइंट असणाऱ्या संवादात शब्दांचे महत्त्व फक्त 7 टक्के; यात प्रावीण्य मिळवायचे कसे?

7) जीवनमंत्र:मोबाइल व्यसनाचा वेग दारूपेक्षा 300 टक्के जास्त; मेंदूवर कंपन्यांचा ताबा, अशी करून घ्या सुटका!

8) डोक्यातला केमिकल लोचा!:यशात 85 टक्के वाटा असणाऱ्या भावनांची निर्मिती होते कशी; जाणून घेऊ आजच्या जीवन मंत्रमध्ये

9) करिअर कसे निवडावे ?:मुलांचा कल कसा ओळखावा, पालिकांची भूमिका काय असावी, जाणून घेऊ आजच्या जीवन मंत्रमध्ये

10) भावना वैश्विक कशा असतात ?:आपण प्रेमात का पडतो, त्यांचे महत्त्व काय ? जाणून घेऊ आजच्या जीवन मंत्रमध्ये

11) मूल बंडखोर का होते ?:खोटे का बोलते, पालकांना रिजेक्ट का करते, जाणून घेऊ आजच्या जीवन मंत्रमध्ये

12) भावना संसर्गजन्य कशा असतात?:भावना ट्रान्सफर कशा होतात; संगत कोणाची असावी, जाणून घेऊ जीवन मंत्रमध्ये

13) 'भावना' जीव कसा वाचवते?:मित्र कसा होते, आपल्याला अलर्ट कशी करते, जाणून घेऊ जीवन मंत्रमध्ये!

14) जीवघेणा एकटेपणा कसा घालवावा?:स्वतःवरचा नकारात्मक फोकस कसा कमी करावा, जाणून घेऊ आज!

15) झोप उडवणाऱ्या चिंतेचे करायचे काय?:विचारांचा अतिरेक थोपवायचा कसा , जाणून घेऊ आजच्या जीवन मंत्रमध्ये!

16) भावनेतून ऊर्जा कशी मिळते?:जाणून घेऊ जीवन मंत्रच्या आजच्या भागामध्ये, भावनिक बुद्धिमत्ता तज्ज्ञ किशन वतनी यांच्याकडून

17) फोबिया असतो काय?:भीतीवर मात कशी करावी, जाणून घेऊ राज्य मानसशास्त्र परिषदेच्या अध्यक्षांकडून

18) भावना दाबणे धोक्याचे कसे?:शरीरात अखंड वाहणाऱ्या ऊर्जेच्या नदीचे करायचे काय, जाणून घेऊ आज!

19) लव्ह ते ब्रेकअप:श्रद्धा वालकर हत्येसारखे प्रकरण कसे घडते, टोकाची मानसिकता का होते? जाणून घेऊ!

20) विचार, कृती, भावनेचे चक्र असते काय?:जाणून घेऊ भावनिक बुद्धिमत्ता तज्ज्ञ किशन वतनी यांच्याकडून

21) ब्रेकअप ते लव्ह:प्रेम कसे टिकवावे, नाते खोलवर कसे रुजवावे, सपोर्ट सिस्टीम म्हणून काम कसे करावे, जाणून घेऊ

22) कुठल्याही कामावर फोकस कसा करावा; मेंदूला कसे प्रशिक्षण द्यावे, जाणून घेऊ आज

23) भावनिक बुद्धिमत्तेत सुयोग्य निर्णय म्हणजे काय, तो नेमका कसा असावा, जाणून घेऊ आज

24) भावनिक बुद्धिमत्तेचा नेमका फायदा काय, त्यातून ऊर्जा कशी मिळते, जाणून घेऊ आज

25) भावनिक बुद्धिमत्तेचे 3 विभाग कोणते, त्यांचे काम काय; जाणून घ्या किशन वतनी यांच्याकडून

26) भावनेची मुळाक्षरे कोणती, त्यांची ओळख का महत्त्वाची; जाणून घेऊ किशन वतनी यांच्याकडून

27) मेंदूचे बंद पडलेले सर्किट कसे सुरू करावे, भावनेला नंबर का द्यावा, जाणून घेऊ किशन वतनी यांच्याकडून

28) रॉबर्ट प्लुचिकचा भावनांचा उत्क्रांतीवादी सिद्धांत काय, त्याचा उपयोग होता कसा, जाणून घेऊ आज

29) राग नेमका असतो काय, विश्वास कसा ओळखावा, जाणून घेऊन भावनिक बुद्धिमत्ता तज्ज्ञ किशन वतनी यांच्याकडून

30) कॉम्प्लेक्स इमोशन म्हणजे काय, हृदयात प्रेमाची भावना कशी तयार होते, जाणून घेऊ आज!