आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत मागणी:गेल्या 7 वर्षांत निवड झालेल्या मराठा तरुणांना नोकरीत घ्या!

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठा आरक्षण कोट्यातून गत सात वर्षांत स्पर्धा परीक्षेत निवड झालेल्या मराठा उमेदवारांना शासकीय नाेकरीत सामावून घ्या, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक विनोद पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली. एसईबीसी, ईडब्ल्यूएस, मराठा आरक्षण लागू झाल्यानंतर २०१४ ते २०२० पर्यंत स्पर्धा परीक्षेतून निवड झालेल्या सर्व उमेदवारांची निवड करावी, अशी मागणी मुंबईतील बैठकीत झाली हाेती. मात्र, महावितरणचे ७०० पेक्षा अधिक, कोशागार, आरटीओ, न्यायालय आदी विभागातील एकूण ४ हजारांवर उमेदवार होते. या सर्वांची यादी तयार करून निवड प्रक्रिया राबवावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

छत्रपतींची गादी आमची अस्मिता छत्रपती संभाजीराजेंनी आता संघटना काढली आहे. छत्रपतींची गादी आमची अस्मिता आहे. त्यांनी कुणाला विरोध केलेला नाही. तरी तुमचे काही प्रश्न असतील तर ते त्यांनाच विचारावे, असे सांगत पाटील यांनी मुंबईच्या बैठकीतील दबावतंत्रावर अधिक बोलणे टाळले.

बातम्या आणखी आहेत...