आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यातील 238 तरुणांना मिळाले नियुक्तीपत्र:पालकमंत्री, सहकार मत्र्यांच्या हस्ते ऑर्डर; तरुणांचा आनंद गगनात मावेना

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य शासनाच्या वतीने ७५ हजार रोजगार नियुक्तीपत्र देण्याचा विभागीय स्तरावरील रोजगार मेळावा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात पार पडला. या कार्यक्रमात 238 जणांना नियुक्ती पत्रे देण्यात आली. यामध्ये विविध विभागातील नव्याने नियुक्ती झालेल्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

कार्यक्रमाला पालकमंत्री संदीपान भुमरे, सहकार मंत्री अतुल सावे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, आ. संजय शिरसाट, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, महावितरणचे संचालक मंगेश गोंदावले, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, विभागीय उपायुक्त जगदीश मणियार यांची उपस्थिती होती.

मेळाव्याचे थेट प्रक्षेपण

कार्यक्रमावेळी मुंबईतून होणाऱ्या रोजगार मेळाव्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाषणे या कार्यक्रमात ऐकवण्यात आली. त्यानंतर पालकमंत्री आणि सहकार मंत्री या दोन्ही मंत्र्यांनी कुठलेही भाषण या कार्यक्रमात केले नाही. कार्यक्रमाला मराठवाड्यातून सर्व कर्मचारी नियुक्ती पत्र घेण्यासाठी आले होते. यामध्ये जलसंपदा महावितरणसह विविध विभागाचे तरुण उपस्थित होते. सभागृह नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांची मोठी गर्दी होती.

एकाच वेळी नियुक्तीपत्र

रोजगार मेळाव्यात पात्र ठरलेल्या जवळपास राज्यभरातील जवळपास ७५ हजार उमेदवारांना एकाच वेळी नियुक्तीपत्र देण्याचा कार्यक्रम शासनातर्फे आयोजित करण्यात आला होता. मराठवाडा विभागातील कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन नियोजन समिती सभागृहात पार पडला.

आम्ही प्रतीक्षेत होतो...

सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओकॉन कॉन्फरसिंग द्वारे संबोधित केले. पालकमंत्री भुमरे, सहकारमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते हे प्रमाण पत्र देण्यात आले. यावेळी अनेक दिवसापासून रखडलेले नियुक्ती पत्र देण्यात आल्यामुळे युवकांनी देखील समाधान व्यक्त केले. यावेळी पैठण येथील पूजा सुरेश पवार यांनी सागितले की, मला ही नियुक्ती मिळाल्यामुळे खूप आनंद झाला आहे. या नियुक्तीची मी प्रतीक्षा करीत होते. आमच्यासाठी हा आनंदाचा क्षण असल्याची प्रतिक्रिया पूजा पवार यांनी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...