आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा:आज अकरा वाजेपर्यंत घरे रिकामी करा, उद्या पहाटेच लेबर कॉलनीत पाडापाडी; बुधवारी 100 मीटर परिसरात जमावबंदीचे आदेश लागू

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लेबर कॉलनीतील रहिवाशांनी मंगळवारी (१० मे) सकाळी ११ वाजेपर्यंत स्वत:हून घरे रिकामी करून प्रशासनाच्या ताब्यात द्यावीत. प्रशासनाच्या वतीने बुधवारी सकाळी ६ वाजेपासून पाडापाडीची कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोमवारी दिली. दरम्यान, या भागात बुधवारी जमावबंदी लागू असेल.

जिल्हाधिकारी म्हणाले, ३३८ घरे पाडण्याचे आदेश उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. प्रत्येक वेळी काहीजण स्थगितीसाठी न्यायालयात जातात. आता सर्वोच्च न्यायालयाने प्रशासनाच्या बाजूने निकाल दिला. उच्च न्यायालयाने १० मे रोजी सकाळी ११ वाजेपर्यंतचा वेळ दिला आहे. त्यानंतरही घरे रिकामी नाही केल्यास बळाचा वापर करून जागा ताब्यात घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी १९५६ मध्ये लेबर कॉलनीत निवासस्थाने बांधण्यात आली होती. १९८०-८१ पासून तात्पुरते निवासस्थान म्हणून वाटण्यात आली. इथे राहणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्तीनंतर आणि जे कर्मचारी मृत झाले त्यांच्या कुटुंबांनीही या घरांचा ताबा सोडला नाही. पत्रकार परिषदेस अपर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, उपजिल्हाधिकारी प्रबोधय मुळे, निवासी उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य उपस्थित होते.

अद्याप कोणीही ताबा दिला नाही या भागातील नागरिकांनी स्वत:हून घरे रिकामी करावी. काही लोकांनी सामान घरात ठेवून कुलूप लावले आहे. आम्हाला कोणीही अद्याप ताबा दिलेला नाही. कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी स्वत:हून ताबा द्यावा, असे आवाहन चव्हाण यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...